सांगोला तालुका

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र पातळीवरील जन आरोग्य समित्या सक्रीय होण्याची गरज-शहाजी गडहिरे

सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करुण सरकारी आरोग्य सेवांचा विस्तार वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयुष्मान भारत ही योजना 2018 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्राचे आरोग्य वर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे.सरकारी आरोग्य सेवांवर सनियंत्रन करणे, सरकारी सेवांमध्ये येणाऱ्या अडी-अडचणी सामूहिक रित्या सोडवणे यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर जन आरोग्य समित्या स्थापन करावयाच्या आहेतः या जन आरोग्य समित्या स्थापन होऊन त्या सक्रीय झाल्यास आरोग्य विषयक अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. असे मत अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी व्यक्त केले आहे.
काल पंचायत समिती बचत भवन येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सूरू आसलेल्या “सार्वजनिक आरोग्य सेवावर सामाजिक कृती कार्यक्रम”  या उपक्रमांतर्गत प्रकल्पात समाविष्ट उपकेंद्राची तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सिमा दोडमनी या उपस्थित होत्या.तसेच आरोग्य विस्तार अधिकारी रमेश अंधारे, मिलिंद सावंत यांच्यासह प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या एकोणीस उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम्, एम्. पी. डब्ल्यू, आशा सुपरवायझर तसेच अस्तित्व संस्थेचे कार्यकर्ते विजय धणावडे, सागर लवटे, प्रविण सूर्यगंध उपस्थित होते.
कार्यशाळेत जन आरोग्य समित्यांची  गरज, जन आरोग्य समित्यांची रचना, समित्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या, समितीचे कार्य इत्यादीचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शहाजी गडहिरे यांनी केलें. यावेळी डॉ. सीमा दोडमनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी समुदाय आरोग्य अधिकारी व एएनएम यांनी उपकेंद्रात आलेल्या सर्व रुग्णांना चांगलीं सेवा देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी, रमेश अंधारे,मिलिंद सावंत यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या तालुक्यातील आरोग्य वर्धीनी केंद्रांना आय एस ओ मानांकन कसे मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आपल्या आरोग्य वर्धीनी केंद्रात आलेला रूग्ण प्राथमिक उपचार घेऊन समाधानाने जावावा असे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले सुरुवातीला अस्तित्व संस्थेचे सागर लवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व शेवटीं विजय धनावडे यांनी आभार मानले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रविण सूर्यगंध यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!