म्हणून शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा निर्णय.. पंकजाताईनी सांगितले कारण…..

सांगोला(प्रतिनिधी):- श्रावण महिन्यात मनामध्ये आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेवढी ज्योतिलिंग आहेत, जेवढी शक्तीपीठे आहेत त्याची परिक्रमा करावी. त्यामुळे काही ठरले नसताना ती शिवशक्ती परिक्रम यात्रा झाली. त्या शिवशक्ती परिक्रमेचे आता भव्य रुप झाले असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगोला येथे सांगितले.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या दरम्यान गुरुवार दि.7 सप्टेंबर रोजी स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांनी श्रीमती रतनताई गणपतराव देशमुख यांचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. यावेळी शेकापचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंकजाताई मुंडे म्हणाल्या, अधिक महिन्यात देवाची खूप सेवा केली. खूप वाचन केल े, सर्व कायदे वाचून काढले, कारखान्याच्या माझ्या खूप अडचणी आहेत. बर्याच लोकांच्या अडचणी मार्गी लागल्या परंतू माझ्या कारखान्याची लागल्या नाही. त्या अडचणीचे काय करता येतील त्यासाठी वेळ दिला. ईश्वराची खूप सेवा केली. श्रावण महिन्यात मनामध्ये आल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ज्योतिलिंग आणि शक्तीपीठे आहेत त्याची परिक्रमा करावी. ते काही ठरले नसताना ते शिवशक्ती परिक्रमा असे झाले. आता त्या शिवशक्ती परिक्रमेचे भव्य रुप झाले असल्याचे त्यांनी सांगितले.