नेत्रदान पंधरवडा निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कु. सृष्टी शिंदे प्रथम

सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान सांगोला, सांगोला महाविद्यालय सांगोला, दिशा मेडिकल फॉउंडेशन तसेच जिल्हा अंधत्व निवारण समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने “नेत्रदान पंधरवडा” निमित्त सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कु. सृष्टी दीपक शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
सांगोला महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक सानिका नवनाथ शिंदे, तृतीय क्रमांक पूनम रामचंद्र कोळी, तर उत्तेजनार्थ क्रमांक भगवंत रामचंद्र कोळी व प्रांजली हरिदास राजगुरू यांनी पटकावला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. वंदना गवळी, नेत्रदान समुपदेशक विकास लिंगराज, आपुलकी प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्था सदस्य सुरेश फुले, आपुलकी सहसचिव शरणप्पा हळळीसागर, अरुण जगताप गुरुजी, अरविंद डोंबे गुरुजी, अरविंद केदार, सुरेशकाका चौगुले, संभाजी पाटील, डॉ. विधिन कांबळे, डॉ. रमेश बुगड, डॉ. टी.आर. माने, डॉ. आर.जी.पवार, डॉ.बबन गायकवाड, प्रा. विशाल कुलकर्णी, प्रा. तेजस्विनी हुलवान, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश शिंदे यांचेसह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी, विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना आपुलकी सदस्य सुरेशकाका चौगुले, रमेशअण्णा देशपांडे, कैलास कांबळे, शरणप्पा हळळीसागर तसेच डॉ. सचिन गवळी यांच्या दिशा मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने रोख रक्कमेची बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. अर्जुन मासाळ, डॉ. विजयकुमार गाडेकर, डॉ. नवनाथ शिंदे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे संयोजन डॉ. विधिन कांबळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष लोंढे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन कु. प्रज्योती शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद लोखंडे यांनी केले.