राजकीयसांगोला तालुका

मराठा आरक्षण आंदोलनाला माझा पाठिंबा- पंकजाताई मुंडे

सांगोला(प्रतिनिधी):- मराठा आरक्षण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. त्यांची फसवणूक झाली असेल तर त्या फसवणूकीबद्दल मला अत्यंत खेद वाटतो. सर्वांनी मिळून त्या सर्व नेत्यांनी मिळून आंदोलनकर्त्यांना भेटी देण्यापेक्षा कूठेतरी बसून कायदेतज्ञाना घेवून कागदपत्रे सर्व घेऊन जर बसले तर 7 ते 8 दिवसात कळेल काय करता येईल. एवढा काय अवघड प्रश्न नाही. त्यांना खरे आकडे सांगा.  आम्ही ह्याव देवू त्याव देवू असे सांगत असल्यामुळे मराठा समाजाच्या युवकांमध्ये  संभ्रम निर्माण व अपेक्षा निर्माण झाली. त्यांच्याविषयी मनापासून संवेदना वाटते त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काल गुरुवार दि.7 सप्टेंबर रोजी स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देवून श्रीमती रतनताई गणपतराव देशमुख यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, मराठा आरक्षणाबाबत पूर्वी जी भूमिका होती तीच आता पण असणार आहे. कारण आम्ही भूमिका बदलणार्‍या पैकी आम्ही नाही.एवढ्या पवित्र वास्तूत मी बसले आहे ज्यांनी जीवनाचे अर्धशतक राजकारणात पूर्ण केलेे. गणपतरावांचा उल्लेख म्हणजे कधीही बोल्ड न झालेले आमचे खिलाडी. या वास्तूत बसून मी सागंते, आपली भूमिका न बदलणार्‍या राजकारण्याची लेक मी आहे. माझे आदर्श राजकारणतही तसेच आहे. त्यामुळे माझी भूमिका बदलायचे काही कारण नसल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!