भगवतभक्त ह भ प कै.शारदादेवी(काकी) साळुंखे-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

जवळे(प्रशांत चव्हाण) आपल्या सर्वांच्या माय माऊली ह भ प कै शारदादेवी(काकी)बापूसो साळुंखे-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे वृद्ध महिलांसाठी श्री.सुधीर(राजू) सरवदे गुरुजी जवळे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री सरवदे गुरुजी यांनी आदरणीय काकींनी समाजासाठी केलेले कार्य त्यांची अनाथ गोरगरीब लोकांप्रती असणारी तळमळ त्यांनी उपेक्षितांसाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. व काकींनी केलेल्या समाज सेवेची प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वृद्धाश्रमातील वयस्कर आजी आजोबांना जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून दिल्या. याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक श्री जाधव,श्री बिरा वगरे श्री.गणेश मोहिते, श्री.प्रमोद उरवणे उपस्थित होते.