आपल्याला कीर्तने कमी करायची आहेत पण धर्म वाचवायचा आहे. ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर

जवळे ( प्रशांत चव्हाण) आपल्याला कीर्तने कमी करायचे आहेत पण धर्म वाचवायचा आहे. शिव्या जरूर द्या पण धर्म टिकवायचा आहे. जिथे संपत्ती दया आहे तिथे देव आहे. जीवनात स्वार्थ अहंकार वाढला की व्यक्तीचा नाश होतो. आपण देव नाही पण देवाचा अंश आहे. माणसाच्या जीवनात ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचे ध्यान आहे. सुशिक्षित वाढत गेले आणि वृद्धाश्रमाची संख्या वाढली. वृद्धाश्रमात शेतकरी कुटुंबातील आई-वडील नाहीत या ठिकाणी नोकरीवाल्यांचे आई-वडील आहेत.जन्मदात्या आई वडिलांचा सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे. असे मौलिक विचार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जवळे येथे भगवत भक्त ह भ प शारदादेवी(काकी) बापूसो साळुंखे- पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
पुढे बोलताना ह भ प इंदुरीकर महाराज म्हणाले सध्या समाजात वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. भविष्यात माणसाला जमीन विकत मिळणार नाही. प्रत्येक कुटुंब सध्या विभक्त होत आहेत. मित्रांनो राजकारण,नेता तुम्ही बाजूला ठेवा पण धर्मासाठी एकत्र या महाराज म्हणाले अटॅक हा रोग नसून हा मानसिक तणाव आहे अटॅकला एकच औषध आहे ते म्हणजे झालेली घटना जाग्यावरच विसरा यावेळी इंदुरीकर महाराज यांनी अध्यात्मिक क्षेत्रात भगवतभक्त ह भ प कै.शारदादेवी(काकी)साळुंखे-पाटील यांनी केलेल्या योगदानाचे तोंड भरून कौतुक केले.इंदुरीकर महाराज यांनी सुश्राव्य असे किर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी महाराजांचा सत्कार स्वर्गीय काकींच्या सोबत वारी केलेल्या श्री जगन्नाथ तोडकर,डीवायएसपी सुनील साळुंखे साहेब मा.दीपक आबा साळुंखे-पाटील,जयमलाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तत्पूर्वी सकाळी भगवतभक्त ह भ प कै.शारदादेवी(काकी) बापूसो साळुंखे-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.संभाजी पाचकवडे,मा.आ दीपक आबा साळुंखे-पाटील सौ.जयमाला ताई गायकवाड,चारुशीला काटकर साहेबराव दादा पाटील,डी वाय कुलकर्णी यांच्या शुभहस्ते व डॉ. अजिंक्य नष्टे, डॉ.शैलेश डोंबे,डॉ.सुशांत बनसोडे,डॉ.सौरभ अजळकर,डॉ.अतुल बोराडे डॉ.धनाजी जगताप,डॉ.राहुल इंगवले, डॉ.शंभू साळुंखे,डॉ.महेश लिगाडे,डॉ.निलेश इंगवले डॉ.शितल येलपले व डॉ.मकरंद येलपले यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री नारायणदेव मंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जवळे गाव व तालुक्यातील एकूण 410 रक्तदात्यांनी रक्तदान करून कै.काकींना अभिवादन केले. तसेच दुपारी 2 ते 4 या वेळेत माचनूर येथील भजन सम्राट मस्तान मुल्ला यांचे बहारदार असे भजन संपन्न झाले. त्यानंतर सायं.4 ते 6 या वेळेत जवळे येथील शाहीर सुभाष गोरे आणि सहकारी कलाकारांनी शाहिरीची कला सादर केली. यावेळी त्यांनी शाहिरीतून ह भ प कै.शारदादेवी(काकी) साळुंखे-पाटील यांचा जीवनपट उघडला.
याप्रसंगी.साळुंके पाटील कुटुंबीय,नातेवाईक,जवळे गावचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी तंटामुक्त अध्यक्ष, तसेच जवळा विकास सोसायटी चेअरमन व्हा.चेअरमन,सदस्य, गटसचिव विविध संस्थांचे पदाधिकारी जवळे पंचकोशीतील व तालुक्यातून आलेले नागरिक,महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवतभक्त वैकुंठवासी ह भ प शारदादेवी(काकी) बापूसो साळुंखे-पाटील पुण्यस्मरण समिती सांगोला तसेच विद्या विकास मंडळ जवळे संचलित सर्व प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज उकळे सर सुहास कुलकर्णी गुरुजी यांनी केले तर आभार मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी मानले.