सांगोला तालुका

जि. प.प्राथमिक शाळा दिवाण मळा अजनाळे येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा संपन्न.

 

अजनाळे येथील दिवाण मळा प्राथमिक शाळेत भारतीय प्राचीन संस्कृतीची ओळख असलेला श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिभावाने व कलापरंपरेचे उत्कृष्ट दर्शन घडवून साजरा झाला.शाळेतील मुलांना श्रीकृष्ण व गवळणी बनवण्यात आले होते.

 

फुलांची सजावट आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती.विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी या शाळेत मुख्याध्यापक श्री सोमनाथ हरिभाऊ पोरे व सहशिक्षक श्री.प्रशांत शिवशरण हे नवनवीन संकल्पना व उपक्रम हाती घेवून विद्यार्थांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे कार्य करतात.
आजच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यानी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी अजनाळे परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!