सावे माध्यमिक विद्यालयात डॉक्टर गजानन कोटेवार यांची सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांनी सावे माध्यमिक विद्यालयास भेट दिली विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर त्यांनी आपले अनमोल विचार मांडले शालेय जीवनात मुलांची चांगली जडण घडण व्हावी यासाठी शिक्षकांनी शालेय शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे द्यावे मुलांच्या बुद्धीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय शिक्षकांनी ठेवून शाळेचे व गावाचे नावलौकिक वाढवावे असे त्यांनी आव्हान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हरी मेटकरी यांनी केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापक अर्जुन शेळके यांनी भूषविले ग्रंथालय चळवळीत अग्रेसर कार्य करणारे संजय सरगर अमर कुलकर्णी लक्ष्मण दिघे विष्णू पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती या कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार गावडे सर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले