मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कडलास येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साई कबड्डी अकॅडमी कडलास येथे राज्यस्तरीय ७० किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा कडलास ता. सांगोला येथे दि.०१/०१/२०२४ रोजी संपन्न झाल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, युवा सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील व तालुक्याचे उमलते नेतृत्व यशराजे साळुंखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
   या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुरावभाऊ गायकवाड हे होते याप्रसंगी सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन ॲड.नितीन गव्हाणे, सरपंच दिगंबर भजनावळे, युवा नेते योगेशदादा खटकाळे, माजी उपसरपंच समाधान पवार, राष्ट्रवादी चे माजी ता.अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, रामदास माने सर, शरद मोरे, ॲड. सतीश लेंडवे, प्रशांत साळुंखे ,माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीलआबा पाटील,शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजचे ज्येष्ठ विश्वस्त महादेव गायकवाड, विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पोपट केदार सर, युवा नेते राहुल पाटील, वासूद गावचे माजी सरपंच प्रकाश केदार सर सांगोला शहर प्रमुख समीरदादा पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   या स्पर्धांसाठी माजी उपसरपंच सुनीलकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक सचिव व श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ कडलास या संस्थेचे संचालक गिरीश पाटील सर यांच्या वतीने व साई अकॅडमी कडलास यांच्या सहकार्याने या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री साई कबड्डी अकॅडमी कडलास, द्वितीय क्रमांक बारामती क्रिकेट क्लब, तृतीय क्रमांक राणा प्रताप कळंब, चतुर्थ क्रमांक सेवन स्टार डोरलेवाडी ,या संघांनी पटकावले या स्पर्धेमध्ये एकूण २८ संघांनी भाग घेतला होता यामध्ये पुणे, सांगली, इस्लामपूर, बारामती, बार्शी, पळसदेव, कळंब या ठिकाणाहून संघ सहभागी झाले होते या स्पर्धा सांगोला तालुका कबड्डी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष श्री सुनील भोरे सर ,प्रा.डी के पाटील सर व श्री साई अकॅडमीचे सचिन चव्हाण, अक्षय बागल, पंकज गव्हाणे, नितीन गायकवाड, विकास लिगाडे व यांच्यासह स्पर्धा  खेळाडूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाल्या आहेत.
    या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी भोजन व पहिल्या चार क्रमांकाच्या विजेत्यांना चषक राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे यांच्या वतीने देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button