सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाची कृष्णजनमाष्टमी उत्साहात संपन्न.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये गुरूवार दि-7/9/2023 रोजी कृष्णजनमाष्टमीनिमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु सरिता कापसे मॅडम यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानिमित्ताने नर्सरी ते सिनकेजीचे विद्यार्थी विविध वेशभूषेमध्ये आले होते यामध्ये राधाकृष्ण, गोपिका अशा विविध वेशभूषा धारण केल्या होत्या. विद्यालयाच्या सहशिक्षिका लक्ष्मी स्वामी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कृष्णजनमाष्टमीची माहिती दिली तसेच सहशिक्षिका मीनल पाटील, दिपाली ऐवळे,वर्षा माळी, मीनल दिघे, असरीन शेख यांनी भजन, विविध गाणी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली.विद्यार्थी यामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी स्वामी यांनी केले तर आरिफा मुजावर यांनी सर्वांचे आभार मानले.