मी सदैव देशमुख कुटुबियांच्या पाठीशी- पंकजाताई मुंडे

सांगोला(प्रतिनिधी):- आबा विधानसभेत नेहमी दुष्काळाविषयी बोलत होते. स्व.आबासाहेबांनी मला खूप जीव लावला होता. स्व.आबानी मोठे म्हणून मला नेहमी मार्गदर्शन करायचेे. आबाचे मान मर्यादा ठेवण्याचा गुण खुप कौतुकास्पद होता. विधानसभेतील माझे पहिल्या भाषणाचे त्यांनी खूप छान बोलते असे कौतुक केले होते यासह आमदारकीच्या दोन वेळेच्या आठवणींना उजाळा देत स्व. गणपतराव देशमुख उल्लेख म्हणजे कधीही बोल्ड न झालेले आमचे खिलाडी असून मी सदैव देशमुख कुटुबियांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या दरम्यान काल गुरुवार दि.7 सप्टेंबर रोजी स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देवून श्रीमती रतनताई गणपतराव देशमुख यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी श्रीमती रतनबाई देशमुख यांच्या तब्यतेची चौकशी करुन काळजी घ्या असे सांगितले. त्यानंतर पंकजाताईंनी बंद दाराआड 10 मिनीटे श्रीमती रतनबाई देशमुख व डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा केली. स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनावेळी माझे घशाचे 2 वेळा ऑपरेशन झाले होते. त्यावेळी मला बोलता येत नव्हते त्यामुळे त्यावेळी मला येता आले नसल्याची खंत त्यांनी यावेळी अवजुर्न बोलून दाखविली.
पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, जसे आबा मोठे म्हणून मला नेहमी मार्गदर्शन करायचे तसेच तुम्ही मोठी बहिण समजून मला तुम्ही काहीही सांगा. मला अधिकार असतील तर मीही हक्काने आपणाला सांगेन. भविष्यात मला काहीही हक्काने सांगा मी सदैव देशमुख कुटुबियांच्या पाठीशी असेन असे सांगत डॉ.अनिकेत देशमुख यांच्याविषयी चौकशी करत तुमच्यासारखे स्वच्छ तरुण चेहरे राजकारणात आले पाहिजेत असेही त्यांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना सांगितले.
यावेळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव, समाधान पाटील, गिरीष गंगथडे, तुकाराम भुसनर, किरण पवार, वैभव केदार, आकाश व्हटे, शिवाजी गायकवाड, वसंत सुपेकर, माणिकचंद वाघमारे, दत्ता टापरे यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.