*प्रा.धनाजी चव्हाण यांना लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील प्रा.धनाजी चव्हाण यांना लोकमंगल नागरी पतसंस्था व लोकमंगल फाउंडेशन सोलापूर यांचेवतीने दिला जाणारा या वर्षीचा लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.सदरच्या पुरस्कारराची घोषणा शिक्षकदिनी सोलापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीमार्फत करण्यात आली असून हा पुरस्कार रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी सोलापूर येथील किर्लोस्कर सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा.चव्हाण सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी चंद्रकुमार नलगे यांच्या ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर एम. फील पूर्ण केले आहे आहे.व मराठी विषयामध्ये पीएच.डी.साठी संशोधन सुरू आहे. त्यांना यापूर्वी शैक्षणिक कार्यासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला ,आदर्श शिक्षक पुरस्कार मनोरमा परिवार सोलापूर, विद्यार्थी परायण शिक्षक पुरस्कार साने गुरुजी कथामाला जिल्हा समितीसोलापूर,राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षक रत्न पुरस्कार नगर व राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला,मुंबई व सामाजिक कार्यासाठी लायन्स क्लबमधील उपविभाग,विभाग व प्रांत स्तरावरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म. शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य गंगाधर घोंगडे , उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते , उपप्राचार्य सौ.शहिदा सय्यद , पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार,बिभीषण माने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष पूज्य गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे विचार प्रमाण मानून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर व सर्व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व रचनात्मक विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या सांगोला विद्यामंदिरमुळे झालेले शैक्षणिक कार्य व माजी प्रांतपाल प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबच्या माध्यमातून होणारे समाजकार्य प्रमाण मानून मला शिक्षकदिनी जाहीर झालेला लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार पुढील कार्यसाठी प्रेरणा देणारा आहे.
*प्रा.धनाजी चव्हाण*