सांगोला तालुका

गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतीसमारोह पुरूषांच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) :- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४२ वा.स्मृतीसमारोह पुरूषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पी.एन.जी. ज्वेलर्स पुणे व्हाईस प्रेसिडेंट अमितजी वैद्य यांचे शुभहस्ते व संस्थेच्या अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली व पी.एन.जी. ज्वेलर्स पुणे एरिया मॅनेजर प्रशांशु पाठक, बास्केटबॉल ॲच्युअर असो.सचिव एम.शेफी यांचे उपस्थितीत थाटात संपन्न झाला.

 

 

यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे , खजिनदार शंकरराव सावंत कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी ,दिंगबर जगताप, ॲड विजयसिंह चव्हाण ,विश्वेश झपके, सांगोला बास्केटबॉल असो. अध्यक्ष सुहास होनराव, उद्योगपती विलास क्षीरसागर, नागेश तेली, प्राचार्य गंगाधर घोंगडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्राचे अनावरण व तैलचित्रास पुष्पहार प्रमुख पाहुणे अमितजी वैद्य यांचे हस्ते समर्पित करण्यात आला.

 

त्यानंतर उद्घाटन समारंभामध्ये सुरुवातीला सांगोला विद्यामंदिरचे माजी पर्यवक्षक व सांगोला बास्केटबॉल असो.माजी अध्यक्ष कै.अय्युब मण्यार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले पी.एन.जी ज्वेलर्स एरिया मॅनेजर प्रशांशु पाठक व बास्केटबॉल ॲम्युचर असो.सचिव एम.शफी यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थित मैदान एक व मैदान दोनचे विधिवत पूजन करून, श्रीफळ वाढवून उद्घाटन संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,सर्व सामना अधिकारी,खेळाडू, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सर्व पदाधिकारी ,विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व सांगोला तालुक्यातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.प्रा.धनाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर पर्यवेक्षक पोपट केदार यांनी आभार प्रदर्शन केले ‌.

व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. या साठी आयोजन व नियोजन व सातत्य खूप महत्वाचे आहे. हे तंत्र गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतीसमारोह राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या रूपाने झपके कुटुंबीय व विद्यामंदिर परिवाराकडून अत्यंत कुशलतेने हाताळले जात असून. भविष्यात खेळाडूंच्या यशस्वीतेचे भाग्यपत्रकच बनवले जात आहे
अमितजी वैद्य, व्हाइस प्रेसिडेंट पी.एन.जी.ज्वेलर्स, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!