मराठा समाज आंदोलकांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये- डॉ.भाई.बाबासाहेब देशमुख ; श्री.मनोज जरांगे-पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेवून आंदोलनास पाठिंबा

सांगोला(प्रतिनिधी):-मराठा समाज आंदोलकांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये.मराठा समाजाने वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये.शासन त्यांच्या न्याय हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहत नसेल तर आपण लढा देऊ परंतु स्वतःच्या जीविताची काळजी घ्या. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेकापक्ष सोबत असेल असा विश्वास डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिला.

अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले श्री.मनोज जरांगे-पाटील यांची शुक्रवार दि.8 सप्टेंबर रोजी शेकाप नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेऊन चर्चा करत आंदोलनास सशर्त पाठिंबा दिला.
लाठीचार्जची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. सरकारने या विषयाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा असून त्याकरिता कितीही मोठा लढा द्यावा लागला तर तो आपण देवू असे आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.

यावेळी सांगोला मार्केट कमिटीचे सभापती समाधान पाटील, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती गिरीश भाई गंगथडे ,रमेश पवार, विकास इंगोले, गणेश शिनगारे, अण्णासाहेब पवार, वैभव केदार, अरविंद केदार, पिंटू पाटील, किरण पवार उपस्थित होते.