*पहिल्याच दिवशी चुरशीच्या सामन्यात सांगोलकरांनी अनुभवला थरार*; गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४२ वा.स्मृतीसमारोह पुरूषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धाच्या पहिल्या दिवशी बी.टी.एस.(मिरज) विरूद्ध सांगोला, ऑल स्टार(संभाजीनगर विरूद्ध सहारा स्पोर्ट्स क्लब (सोलापूर),जी.के.पी. घाटकोपर (मुंबई), विरूद्ध मॉर्निंग क्लब (मिरज), व प्रिन्स युनायटेड कोल्हापूर विरूद्ध सेंट्रल वायएमसी (मुंबई) असे पाच सामने झाले.
यामध्ये बि .टी.एस.(मिरज),एमएसएम (संभाजीनगर) जे के पी मुंबई, वाय सी एम ए घाटकोपर व सेंट्रल वायएमसी (मुंबई) हे संघ विजयी झाले यामध्ये प्रिन्स युनायटेड कोल्हापूर विरूद्ध सेंट्रल वायएमसी (मुंबई) हा अतिशय चुरशीचा सामना झाला.
दि.८ सप्टेंबर २०२३ ते १० सप्टेंबर २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे होणाऱ्या पुरुषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल एस.टी.बी.ए. (सांगोला), महर्षी जिमखाना (अकलूज), ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब (सोलापूर), सहारा स्पोर्ट्स क्लब (सोलापूर), बी.टी.एस.(मिरज), इंडियन जिमखाना (मुंबई), एफ.ए क्लब (मुंबई), जय हिंद बास्केटबॉल (कडा), वारणा बास्केटबॉल (वारणानगर), मुधोजी क्लब (फलटण), वाय.एम.सी.ए. घाटकोपर (मुंबई), डू ईट बास्केटबॉल (कोल्हापूर), विद्या प्रतिष्ठान (सोलापूर), जी.के.पी. घाटकोपर (मुंबई), ऑल स्टार (संभाजीनगर), मॉर्निंग क्लब (मिरज), डेक्कन जिमखाना (पुणे), सेंट्रल वायएमसी (मुंबई), पोलीस मुले (सोलापूर) सातारा जिमखाना (सातारा) शिवतेज गुंकी, कोल्हापूर बास्केटबॉल (कोल्हापूर) पोलीस मुले (मुंबई), सोलापूर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (सोलापूर) या संघांना निमंत्रित केले आहे सदर स्पर्धा साखळी पद्धत व बाद पद्धतीने खेळल्या जाणार आहेत..