सांगोला तालुका

सांगोला तालुक्यातील शेतक-यांची वीज तोडणी थांबवून तात्काळ वीज पुरवठा सुरु करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी.

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी )सांगोला तालुक्यातील शेतक-यांची वीज तोडणी थांबवून तात्काळ वीज पुरवठा सुरु करावी या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यावतीने महावितरणचे अधिकारी यांना देण्यात आले.

सांगोला तालुक्यातील शेती पंपासाठी सुरु असलेला
वीज पुरवठा महाविरण विभागाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांचे
मोठे नुकसान होत आहे. तसेच सांगोला तालुक्यातील असंख्य शेतक-यांच्या फळबागा, भाजीपाला. जनावरे, गुरे
यांच्या पिण्याच्या पाणीसाठी यांना देखील वीज तोडणीचा फटका बसत आहे. अचानकपणे तोडण्यात आलेला
वीज पुरवठयामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. यामुळे अनेक शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नुकसान
झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई करण्यात यावी. शेतकरी व वीज पुरवठा अधिकारी यांनी
समन्वयाने मार्ग काढून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा ही विनंती करण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महावितरणचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली.
त्यावेळी जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे ,तालुकाप्रमुख सूर्यकांत गाडगे, तालुका समन्वयक भारत मोरे, सांगोला शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब ,उपतालुकाप्रमुख अरविंद पाटील, उपविभाग प्रमुख रघुनाथ ऐवळे, युवा नेते तुषार इंगळे , पोपट खरात ,अक्षय रुपनर, ज्ञानेश्वर पोळ, उद्धव हिप्परकर ,दगडू होनमने, गणेश खाडे , संजय अनुसे, संजय तंडे, दादा सकट, भाऊसाहेब शिंदे, सागर जावीर, गणेश घाडगे यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!