गुरुवर्य बापूसाहेब झपके तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संस्कृती लोंढे प्रथम

सांगोला(प्रतिनिधी):- ज्याला वाचता येतं त्याला चिंतन करता येतं,ज्याला चांगलं चिंतन करता येतं त्याला चांगलं बोलता येतं,ज्याला चांगलं बोलता येतं तो निश्चितपणे जग जिंकतो.जगाला जिंकायचं असेल तर बोलता येणे गरजेचे आहे, कारण शब्दांनीच जग जिंकता येतं असे प्रतिपादन वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे व परीक्षक विक्रम बिस्किटे यांनी केले सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम बिस्किटे बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकर सावंत, प्राचार्य गंगाधर घोंगडे, परीक्षक गजानन गुर्जर,सागर विश्वासे, शिवाजी बंडगर,राजेश्वरी कोरे, शुभांगी चवरे, उपस्थित होते. पुढे बोलताना बिस्किटे म्हणाले की, वाचनातून माणसाचं मन समृद्ध होतं,समृद्ध मन जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ते निश्चितपणे समोरच्याच्या मनात घर करतं. प्रत्येकाच्या मनाला जिंकायचं असेल तर आपल्याला बोलता आलं पाहिजे चांगलं लिहिता आलं पाहिजे आणि वाचता आलं पाहिजे.असे सांगत कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या अमोघ कार्याचा गौरव करत. स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी परीक्षक शिवाजी बंडगर व राजेश्वरी कोरे यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व तैलचित्रास परीक्षक,मान्यवर,स्पर्धक विद्यार्थी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व नंतर पात्रता फेरी व अंतिम फेरी या स्वरूपात ही स्पर्धा संपन्न झाली.
यास्पर्धेमध्ये संस्कृती लोंढे सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला प्रथम क्रमांक,वैष्णवी इंगोले स.शा.लिगाडे विद्यालय अकोला, द्वितीय क्रमांक ,स्नेहल जानकर उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला, तृतीय क्रमांक , अनुराधा फाटे छत्रपती शिवाजी विद्यालय धायटी चौथा क्रमांक तन्वी मोटकुळे स.शा.लिगाडे विद्यालय अकोला पाचवा क्रमांक असे यश संपादन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम स्वरूपात बक्षिस,सन्मानपत्र व झपके कुटुंबीयांच्या वतीने देण्यात येणारे सन्मान चिन्ह प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व परीक्षक यांचे हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी, शिक्षक.शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.परीक्षक सत्कार निवेदन मिलिंद फाळके यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर पर्यवेक्षक पोपट केदार यांनी आभार मानले.