कोळा “आदर्श” पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद ~ डॉ बाबासाहेब देशमुख; कोळा येथे डॉ देशमुख यांची पतसंस्थेला सदिच्छा भेट

कोळ्यासारख्या ग्रामीण भागातील व परिसरातील सर्वसामान्य लोकांना व्यापारी वर्गांना जनतेला गोरगरिबाला अडचणीच्या काळात नेहमीं मदतीचा हात देणारी कोळा पंचक्रोशीत प्रसिद्ध नावाजलेल्या आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या कोळे या संस्थेला भेट देताना आनंद होत आहे संस्थेचे बँकिंग क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय कौतुकास्पद असल्याचे विचार शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला जि सोलापूर आदर्श पतसंस्थेस डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सन्मानपूर्वक कोळा गावचे ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर (पुढारी), चेअरमन सिताराम सरगर,लोकप्रिय व्हा चेअरमन सिकंदर पटेल (चाचा), मॅनेजर विलास सरगर यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व संचालक मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ बाबासाहेब देशमुख म्हणाले आदर्श संस्थेचे उत्कृष्ट काम पाहून प्रभावित झालो माझा सत्कार केल्याबद्दल चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाला धन्यवाद देतो कोळ्या सारख्या ग्रामीण भागात संस्था उभा करून एक चांगले गौरवास्पद काम केले आहे सहकार क्षेत्रातील काय अडचण असेल कोणतीही काम असेल तर कधीही कळवा सहकार्य निश्चित केले जाईल असे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी सांगितले.
यावेळी मॅनेजर विलास सरगर यांनी संस्थेचा कामकाजाचा कर्ज वाटप ठेवी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास कोळा गावचे जेष्ठ नेते तुकाराम दादा आलदर,पुढारी चेअरमन सिताराम सरगर, व्हा सिकंदर पटेल चाचा, माजी उपसरपंच उत्तम तात्या आलदर, पत्रकार जगदीश कुलकर्णी, समाजसेवक ईश्वर घाडगे,कुंडलिक आलदर , लोकसेवक रमेश कोळेकर (पंच), युवा नेते बाळासाहेब कोळेकर,प्रल्हाद मेटकरी(बापू), सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे,विजय माळी,ॲड निलेश मदने युवक नेते संदीप पाटील, सयाप्पा कोळेकर, युवा नेते विनोद कोळेकर,अनिकेत पोरे महादेव खंडागळे,ज्ञानेश्वर खंडागळे, सौरभ पोरे, शुभम स्वामीयांच्यासह आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॅनेजर विलास सरगर, विजय आलदर, सौ वैशाली आलदर, किसन नकाते, संजय खंडागळे, दत्ता मदने, मच्छिंद्र आलदर, नारायण चोरमुले यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक सिताराम सरगर सर्वांचे आभार मॅनेजर विलास सर्वर यांनी मानले.