लेबर फेडरेशन निवडणुकीत निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्याचा विजय तर जातीवादाला चपराक..      ॲड सचिन देशमुख 

सोलापुर जिल्हा लेबर फेडरेशनची निवडणुक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीकडून सोलापुर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष राहीलेले व माजी जि.प.सदस्य तसेच शेतकरी कामगार पक्षाचे व स्व.आम.भाई गणपतराव देशमुख यांचे विश्वासु सहकारी बाबा करांडे यांची सांगोला तालुक्यातुन उमेव्दारी जाहीर केली होती.वास्तविक पाहता ही उमेद्वारी जाहीर झाल्यानंतर बिनविरोध पार पडणे सहज शक्य असताना सुध्दा काही लोकांनी बाबा कारंडे  हा आपणास वरलोड आहे आणि तो धनगर समाजाचा नाही  या एकमेव कारणासाठी येथील काही नेत्यांनी बाबा करांडे यांच्याविरोधात अंकुश येडगे यांना उमेदवार म्हणून लेबर फेडरेशनच्या आखाड्यात उतरविले.त्यामुळे निष्ठावंत शेकाप विरुध्द बंडखोर शेकाप अशी सरळ लढत या निमीत्ताने पहावयास मिळाली.या लढतीकडे संपुर्ण सांगोला तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.बाबा करांडे शेकापचे निष्ठावंत नेते आहेतच पण जिल्हा लेबर फेडरेशच्या कामकाजाचा त्यांना गाढा  अभ्यास सुध्दा आहे.त्यामुळे सांगोल्यातुन त्यांची  उमेद वारी ही रास्त असताना सुध्दा येथिल काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपणास बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  विचारले पाहिजे म्हणून आपल्या अहंकारी स्वभावामुळे बाबा यांचे विरोधात उमेदवार पुढे आणला.
यामुळे शे का प चे फार मोठे नुकसान होत आहे हे काही सुज्ञ नेत्याच्या लक्षात आले नाही त्यामुळे या निवडणुकीला जातीयवादी वळण देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बाबा करांडे हे स्व.आबासाहेब यांचे बरोबर राहिले असल्याने आणि त्यांनी लेबर फेडरेशन मधे खूप चांगले काम केले असल्याने शेकाप मधील मतदारांनी व  त्या व्यतिरिक्त सर्व नेत्यांनी बाबा करांडे यांना पाठिंबा दिल्याचे निवडणुकीतील निकालावरून दिसून येते खर तर बाबा करांडे हे खूप अभ्यासू आणि कामसू नेते आहेत आज ओबीसी समाजाचे भविष्यातील आकर्षण म्हणून त्यांना अमच्यासहित मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी शे का प साठी खूप मोठे योगदान दिले आहे किंबहुना स्व. आबासाहेब यांच्या विजयात आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था चे निवडणुकीतील यशात खूप मोठे योगदान आहे गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मधे बाबा करांडे यांनी लक्ष घातल्यामुळे बुधेहाळ येथील लवटे ताई निवडून येऊन सभापती झाल्या माझ्या कोळे जिल्हा परिषद गटामध्ये लोणारी समाजाची खूप मोठी ताकद आहे आणि माझ्या विरोधात लोणारी समाजाचा उमेदवार असतानासुद्धा बाबांनी स्व. आबासाहेब  यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारामुळे जातीयवादाला थारा  न देता माझा प्रचार केला आणि माझ्या विजयाला हातभार लावला परंतु बाबा कारंडे याचे हे काम विसरून ते फक्त लोणारी समाजाचा आहे आणि आपले ऐकत नाही म्हणून त्यांना पडण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला त्यामुळे शे का पक्षमधे अल्पसंख्याक समाज असुरक्षित आहे ही भावना जोर धरू लागली आहे आणि याचा निश्चित पणे शे का पक्षाला तोटा होणार आहे या पूर्वीच्या सहकार मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकपूरवि झालेल्या पक्ष बैठकीत मी अल्पसंख्याक समाजावर शे का प मधे अन्याय होत आहे म्हणून पक्ष बैठकीत जाहीरपणे मत व्यक्त केले होते त्याचा परिणाम म्हणून माझ्याविरोधात कारस्थाने रचून ज्या कोळे गटामुळे शे का पक्ष आज पर्यंत सतेत राहिला त्या कोळे गटावर अन्याय करण्याचे काम स्वयंघोषित नेत्यांनी केले आणि मी पक्षातून बाहेर कसा पडेल याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रकार या वेळी बाबा करांडे यांचे बाबतीत झाला आहे परंतु बाबा करांडे हे कसलेले राजकीय कलाकार आहेत हे ते विसरले होते त्यामुळे निवडणुकीत अपेक्षित यश बाबा याना मिळाले बाबा यांचे राजकीय कौशल्य खूप मोठे आहे ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि येणाऱ्या काळात ही निश्चित राहतील आज बाबा करांडे यांचे बरोबर मी स्वतः , बाळासाहेब काटकर, संतोष देवकते, कोळवले सर, अमोल खरात, नितीन नरळे, दादा जगताप आणि अन्य असंख्य  सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत आणि येणाऱ्या काळात अम्म्ही सर्वजण मिळून संगोल्याचा भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीचा राजकीय निर्णय घेऊन वाटचाल करणार आहोत आणि यापुढे ही पक्षातील जातीवादी धोरणावर राज्य नेतृत्वाचे डोळे उघडणार  नसतील तर आमच्या निष्ठावंत शे का पक्ष मधील कार्यकर्ता विधानसभेची निवडणूक लढविणार हे मात्र निश्चित आहे
   स्व.आम.भाई गणपतराव देशमुखांच्या काळात येथे जाती पातीचे राजकारण केव्हा झाले नव्हते.पण भाई गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर त्यांच्या विचाराचे खरे वारसदार बाजुला सारत अनाहुतपणे घराणेशाही करुन  पुरोगामित्व या तत्वालl बाजूला सारण्याचे काम काही लोक करीत आहेत पण त्यांच्या या वागण्यामुळे शे का पक्ष कमकुवत होत आहे हे ते विसरून चालले आहेत त्यामुळे आता आपण पक्ष टिकविण्यासाठी अशा लोकांना थांबविण्याची गरज आहे अन्यथा पक्षाचे फार मोठे नुकसान होणार आहे
     स्व.आबासाहैबांनी आपल्या संपुर्ण हयातीत सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि ईतर जातसमुहाबद्दल असणारी त्यांची आकसाची भावना कधीही नव्हती पण आता वारंवार  पक्षात निष्ठावंत विरोधी जातीयवादी विचारधारा असे सरळ सरळ दोन गट पडले आहेत  त्यामुळे अशा अडेलतट्टु आणी अहंकारी भुमिकेमुळे शेकापची शकले उडण्यास विलंब लागणार नाही अशी भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडणुकिच्या माध्यमातुन वाटत आहे. तसे होऊ नये यासाठी राज्य पातळीवरील  नेतृत्व मां भाई जयंत पाटील आणि चिटणीस मंडळ  प्रयत्न  करेल अशी आशा बाळगतो आणि बाबा करांडे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button