नाझरे येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दत्ता कोकरे(नाझरे): नाझरे येथे बारा बलुतेदार समाज तसेच नाझरे ग्रामस्थांच्या वतीने विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच रशीद काझी सर व माजी उपसरपंच सौ.लोहार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वकर्मा समाज संघटना शाखा नाझरे ची स्थापना देखील करण्यात आली. शाखेचे उदघाटन समीर मुलाणी, इम्रान काझी, वासुदेव आलदर यांच्या हस्ते करण्यात आले.संघटनेच्या अध्यक्ष पदी संभाजी हरिहर यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा सोनार,खजिनदार नितीन टिंगरे,सचिवपदी युवराज लोहार,समाधान पवार तसेच शैलेश पवार यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.