सांगोला येथे उद्या पाणी टंचाई विषयक आढावा बैठक
अपुऱ्या पर्जन्यामुळे सांगोल्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी टंचाई विषयक विविध बाबींवर चर्चा करणेसाठी उद्या गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायं. 05.30 वाजता बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे पाणी टंचाई विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी लोकसभा सदस्य खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व विधानसभा सदस्य आ. शहाजीबापू पाटील, मा. आ. प्रशांतराव परिचारक, श्री दिपक आबा साळुंखे पाटील, श्री. कल्याणराव काळे, श्री. डॉ. बाबासाहेब देशमुख श्री. चेतनसिंह केदार, श्री. बाबूराव गायकवाड , श्री. गुंडादादा खटकाळे, श्री. दादासाहेब बाबर, श्री. दादासाहेब लवटे, श्री. अभिषेक कांबळे, तानाजी काका पाटील, श्री. सोमा मोटे, श्री. कालिदास कसबे, श्री. मधुकर बनसोडे, खंडू सातपुते, उपस्थितीत राहणार आहेत.
तरी या बैठकीस संबंधित अधिकारी, पदाधिकार्यानी उपस्थित रहावे. असे आवाहन प्रभारी तहसीलदार किशोर बडवे यांनी केले आहे .