पायोनियर स्कूलमध्ये हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा संपन्न.

खंडोबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पायोनियर इंग्लिश , सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पायोनियर गुरुकुल या शाळेत हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पायोनियर शाळेत विद्यार्थांना सर्व कला अवगत होण्यासाठी दरवर्षी विविध विद्यार्थी विकासात्मक उपक्रम हाती घेतले जातात.त्याचाच एक भाग म्हणून आज ज्युनियर के.जी.ते१० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना चित्रकला व अक्षरलेखन यामध्ये विकास व्हावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले होते.
आजच्या हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेचे नियोजन प्राचार्य श्री.अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री. अशुतोष रुपनर सर , प्राथमिक विभाग प्रमुख श्रीमती राऊत मॅडम , सौ.वैशाली येलपले मॅडम सौ पूजा पवार मॅडम , काजल कोळवले मॅडम आणि सौ.बाबर पी एस यांनी परिश्रम घेवून आजची स्पर्धा यशस्वी केली.