पुणे विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांची सांगोला विद्यामंदिरला सदिच्छा भेट

38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर अंतर्गत सांगोला विद्यामंदिर प्रशाला मध्ये कार्यरत एनसीसी विभागाचे कामकाज पाहण्यासाठी पुणे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मित्रा साहेब यांनी दिनांक 11/ 9/2023 रोजी सदिच्छा भेट दिली.
1967 साली सांगोला विद्यामंदिर मध्ये सुरू झालेल्या एनसीसी विभागाचं कार्य कशा पद्धतीने चालते याचा आढावा त्यांनी घेतला. 1967 साली एनसीसी विभाग सुरू झाल्यापासून 2023 पर्यंत कुठल्याही ग्रुप कमांडर नी यापूर्वी सांगोल्याला भेट दिली नव्हती ही त्यांची ऐतिहासिकच भेट ठरली. एनसीसी विभागामार्फत त्यांचे साजेसे असे स्वागत करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर घोंगडे सरांनी ब्रिगेडियर अर्जुन मित्रा साहेबांचा उत्तम प्रकारे स्वागत व सन्मान केला.
ब्रिगेडियर साहेबांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला त्याचबरोबर कशा पद्धतीने ट्रेनिंग देऊन उत्तम फायर घडवले यासंदर्भात 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे कर्नल राजेश गजराज सरांनी माहिती दिली. अर्धा तास चाललेल्या चर्चेमध्ये ब्रिगेडियर साहेबांनी स्वतः मकरंद अंकलगी सर हे एक उत्तम ट्रेनर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शाळांनीही आपल्या प्रशालेत चांगले फायरर घडवून शाळेचे बटालियनचे व पुणे ग्रुपचे नाव लौकिक करावे अशी आशा व्यक्त केली. सर्व कॅडेट्स हे ज्या रायफल च्या माध्यमातून ट्रेनिंग घेत आहेत त्या सर्व 6 रायफली अंकलगी सरांनी स्वतः खरेदी करून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत ही बाब त्यांना विशेष कौतुकास्पद वाटली म्हणूनच ब्रिगेडियर साहेबांनी स्वतः लक्ष घालून अंकलगी सरांना एनसीसी साठी लागणाऱ्या रायफलचे लायसन्स मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ज्यामुळे रायफल च्या कमतरतेमुळे अनेक विद्यार्थी रायफल शूटिंग पासून वंचित राहतात त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच संस्था व प्रशाला इच्छुक असेल तर विशेष अधिकारांमध्ये प्रशालेतील एनसीसीची स्ट्रेंथ वाढवून देण्याचे आश्वासन दिले.
कर्नल राजेश गजराज सरांनी अंकलगी सरांच्या सांस्कृतिक सहभागाबद्दल विशेष कौतुक करून त्यांनी रिपब्लिक डे साठी ही विद्यार्थ्यांना घडवावे व दिल्लीपर्यंत मुलांचा प्रवास सुखकर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उपलब्ध असलेल्या साहित्याचा व जागेचा सदुपयोग करून सायकलच्या पार्किंग मध्ये रायफल शूटिंग रेंज तयार केल्याबद्दल ही त्यांनी विशेष कौतुक केले. मुख्याध्यापकांनी एनसीसी विभागासाठी थोडी मोठी जागा उपलब्ध करून देऊन एनसीसीचा आणखी विस्तार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा अशी इच्छा व्यक्त केली. एनसीसी कॅडेट बरोबर मनसोक्त गप्पा मारत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीत जाणून घेतल्या , त्यांनी तयार केलेल्या एनसीसीच्या विभागाचे फोटो दालन व व्हिडिओ रील्स पाहिले व प्रशालेतील एनसीसी कॅडेट हे खरोखरच डिजिटल झाल्याचे समाधान व्यक्त केले . सन 2022 मध्ये रायफल शूटिंग मधून ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये दिल्ली गाठलेल्या अर्जंट अभिषेक कोरे व कार्पोरल यश सोनलकर या कॅडेट्स ना त्यांनी आवर्जून भेट दिली त्यांचे कौतुक करून महाविद्यालयीन जीवनात जरूर एनसीसी घ्या व आणखी यश प्राप्त करा अशा शुभेच्छा दिल्या.
.आयुष्यामध्ये एनसीसी मधील अनुशासन व एकता याचा कसा उपयोग होतो याची उदाहरणे ही दिली. एनसीसी प्रमाणपत्राचा उपयोग हा प्रायव्हेट सेक्टर सहित गव्हर्मेंट च्या अनेक नोकरीमध्ये कसा उपयुक्त ठरतो याचीही त्यांनी उदाहरणे देऊन मुलांचे मनोधैर्य वाढवले. कार्यक्रमाची सांगता एनसीसी सॉंग ने करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय ,वंदे मातरम् च्या घोषणा दिल्या. या शुभेच्छा भेटीवेळी प्रशालेचे मुख्याध्यापक गं.ना. घोंगडे उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते उपप्राचार्य शहिदा सय्यद मॅडम पर्यवेक्षक बीएस माने अजय बारबोले सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी थर्ड ऑफिसर उज्वला कुंभार उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्जंट दर्शन चक्रे,कार्पोरल इंद्रजीत अरबळी लान्स कार्पोरल रोहित वाघमोडे, लान्स कार्पोरल ओम इंगवले, ऋषिकेश लोखंडे यश दौंडे सार्जंट वैशाली बिचुकले सृष्टी माने, अंजुम मुलाणी, माजी विद्यार्थिनी अंकिता सावंत , श्री डांगे , कॅडेटअविराज कदम, समद शेख स्वप्नील पोळ नेहाल शेख यांनी विशेष परिश्रम घेतले