सांगोला तालुकामहाराष्ट्र

ग्रामीण भागातील गरीब व गरजू 100 मुलींना शुक्रवारी सायकलींचे वाटप करण्यात येणार- सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे

अटलास कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया मुंबई या संस्थांच्या सहकार्याने व “अस्तित्व”संस्थेच्या वतीने शुक्रवारी  बंधन पॅलेस वाढेगाव रोड सांगोला येथे सकाळी अकरा वाजता ग्रामीण भागांतील विशेषतः वड्यावस्त्यांवरून पायी चालत शाळेत ये जा करणाऱ्या सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील 100 मुलींना सायकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी दिली आहे.

 

ग्रामीण भागांतील गोरगरीब कुटुंबातील मुली आईवडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शाळेत येण्याजाण्यासाठी सायकल विकत घेऊ शकत नाहीत त्यांना दररोज चालत यावे लागते अनेक मुली रोज 3-4 किलोमिटर अंतरावरून शाळेत येतात. सायकल नसल्याने अनेक मुलीना नियमित शाळेत हजर राहता येत नाहीं. या पार्श्वभूमीवर अस्तित्व संस्थेच्या पुढाकारातून अट लास कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या संस्थांच्या सहकार्याने सांगोला व मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यातील मुलींना त्यांच्या शिक्षणाला मदत व्हावी यासाठी चांगल्या दर्जाच्या सायकली मुलींना देत असल्याचे शहाजी गडहिरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी एकुण 61मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले होते,यावर्षी 100 मुलींना मान्यवरांच्या हस्ते सायकली  देण्यात येणार आहेत.

 

यावर्षी निवासी आश्रम शाळा डीकसळ, जवाहर विद्यालय घेरडी, मॉडर्न हायस्कूल घेरडी, सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला, उदयसिंह देशमुख उर्फ भैयु महाराज विद्यालय वाढेगाव, कै.संभाजीराव शेंडे विद्यालय मेडशिंगी, विद्यानिकेतन हायस्कूल गौडवाडी, प्रगती विद्यालय वाणीचिचाळे, गुरूदत्त विद्यालय वाकी, लक्ष्मीदेवी विद्यालय राजुरी तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोनेवाडी तालुका मंगळवेढा, बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील मुलींना सायकल वाटप करण्यात येणार आहे.

 

सदर सायकलिंचे वाटप  अटलास कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे सीएसआर मॅनेजर मा. अभिजित पाटील, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी,रतनचंद् शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, सी.एफ. टी.आय.चे प्रकल्प अधिकारी मान. अमित देशपांडे यांच्या हस्ते व डॉ. श्रद्धा जवंजाळ (अकलूज), जैष्ट सामाजिक कार्यकर्ते अरुण कसबे, अस्तित्व संस्थेच्या एड.सुनिता धनावडे, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे,जितेंद्र जगधणे,संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, युवा सामाजिक कार्यकर्ते दत्ता टापरे, माजी नगसेविका सुनिता खडतरे, वाणीचींचाळे गावच्या सरपंच सौ प्रियांका जितेंद्र गडहिरे, राजलक्ष्मी ऑरगानिक मेडशिंगी चे अजयसिंह इंगवले व सी एफ टी आय चे पर्यवेक्षक नितिन जानकर इत्यादी उपस्थित राहणार असुन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रविण सूर्यगंध, विजय धनावडे, अबोली मोरे, सुनिता गडहिरे, नितीन वाघमारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!