हातीद विभागातील गणेश मंडळांनी तात्पुरते वीज कनेक्शन घ्यावे~ उपकार्यकारी अभियंता हनमंत बनसोडे

सांगोला तालुक्यातील हातीद विभागातील गणेश मंडळांना  व्यावसायिक नव्हे तर घरगुती दराने वीज पुरवठा गणेश उत्सवा मंडळांना केला असून वीज कनेक्शन चे महावितरणच्या हातीद व कोळा कार्यालयात रितसर अर्ज करुन विद्युत कनेक्शनसाठी अर्ज करावेत महावितरण कडून सर्व प्रकारचे सहकार्य तातडीने वीज जोडणी दिली जाईल मंडळांनी तात्पुरते कनेक्शन घेऊन महावितरण ला सहकार्य करावे असे हातीद विभागाचे प्रमुख उपकार्यकारी अभियंता हनुमंत बनसोडे व कोळा विभागाचे प्रमुख राजेंद्र बोराडे यांनी सर्व गणेश मंडळांना आव्हान केले आहे.
 यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता हनुमंत बनसोडे म्हणाले सध्या ग्रामीण भागात गणपतीसाठी विविध मंडळे आकर्षक रोषणाई करतात. त्याचबरोबर काहीजण जिवंत देखावे देखील उभारतात. याकरीता विजेचा वापर करण्यात येतो. अधिकृत वीज जोडणी महत्वाची व सुरक्षेची आहे. विद्युत वायर फिरवताना  विद्युत रोषणाई, देखावे खांब उभारताना ते विद्युत वाहिन्यांच्या जवळ साकारताना, गणेशमूर्ती आणताना संपर्कात येणार नाहीत याची काळजी किंवा अन्य साहित्याला लाईट तार स्पर्श करीत नाही ना याकडे लक्ष राहिल. हानी होवू नये याकरीता खबरदारी घेण्याची गरज आहे.गणेशोत्सवात उत्साहाचे वातावरण महत्वाचे म्हणजे मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्यात येणार असल्याने वीजबिल देखील अतिरिक्त येणार नाही.असे बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कोळा विभागाचे प्रमुख राजेंद्र बोराडे म्हणाले मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. उत्सवासाठी मंडप विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करण्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. मंडप उभारणी करताना संभाव्य अपघात रोखण्यासाठी जोड वायर्स झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा ती वापरणे टाळणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
 कोळा जुनोनी परिसरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नजिकच्या कोळा हातीद  महावितरण कार्यालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तेथे स्वतंत्रपणे याकरीता यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंडळाने महावितरणकडे तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्राचा अर्ज, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगीचे पत्र, पोलीस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयीकृत बँक खात्याचे झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत…
मा श्री राजेंद्र बोराडे ,सहा अभियंता महावितरण कोळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button