कोळा गावाने शांततेची परंपरा कायम ठेवून गणेश उत्सव साजरा करावा ~ पो निरी अनंत कुलकर्णी

सांगोल तालुक्यातील कोळा,कराडवाडी,कोबडवाडी, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी सभासदांनी गणेश उत्सव सर्वांनी एकोप्याने साजरा करून आदर्शवत काम करावे कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नका मोबाईल वरील निगेटिव्ह मेसेज फॉरवर्ड करू नका महापुरुषांच्या विचाराचा आदर करा प्रदूषण टाळा आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा डीजे डॉल्बी बाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करा वीज मंडळाकडे परवानगी घ्या गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर विसर्जनापर्यंत सुरक्षेची जबाबदारी घेणे मंडळाला बंधनकारक राहील वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असे स्टेज उभारू नका पोलीस आपले सेवा कर्तव्य पार पाडत असताना भावना दुखावल्या जाऊ नये अशी गाणी लावू नका पोलिसांशी संवाद साधून त्यांचे सहकार्य घ्या कोळा गावाची बऱ्याच वर्षापासून चालत आलेली शांततेची परंपरा कायम ठेवून पोलिसांना सहकार्य करा असे मत सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला येथे लक्ष्मी मंदिरात आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पो नि कुलकर्णी बोलत होते यावेळी सर्व मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करून सर्वांना संघटित केले व यामधून समाज प्रबोधन घडविले व यासाठी सर्व गणेश मंडळांनी आपली परंपरा सर्व धर्म समभावाची आहे व त्याचे जतन करण्यासाठी डीजे मुक्त तसेच ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवून पारंपारिक वाद्य वाजवून आपापले सण आनंदात साजरे करा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.नियमांचे उल्लांघन करणाऱ्यांवर आपण कठोर कारवाई करू असा इशारा दिला यासाठी पोलिसांना सहकार्य करा व शांतता एकोपा राखून उत्सव शांततेत पार पाडा असे पो नि कुलकर्णी यांनी शेवटी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले गावातील सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते राजकीय मतभेद बाजूला ठेवून गणेश उत्सवासाठी एकत्र येऊन गावातील धार्मिक उत्सव शांततेने साजरा करण्याची गावाची परंपरा आज पर्यंत अखंडित चालू आहे मंडळाच्या युवकांनी उभा केलेल्या फंडातून कार्यक्रम साजरे केले जातात गावात सलोखा निर्माण व्हावा यासाठी गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन आनंदाने उत्सव साजरा करतात पोलिसांना ग्रामस्थांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
कोळा ग्रामस्थांच्यावतीने पोलीस निरीक्षक आनंत कुलकर्णी यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार जगदीश कुलकर्णी, कोळा बिटचे पोलीस वाघ साहेब , काझी साहेब, निंबाळकर साहेब गोपनीय विभागाचे पवार पोलीस पाटील महानंदा वाघमोडे, पोलीस पाटील मदन आलदर,युवक नेते संतोष करांडे, समाजसेविका वंदनाताई सरगर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गोडसे, अध्यक्ष भारत इमडे, उपाध्यक्ष दत्तात्रय सरगर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश करांडे, हनुमंत सरगर, कराडवाडी मारुती सरगर, सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे, यशराजे करांडे अनिकेत पोरे यांच्यासह या बैठकीसाठी गावातील विविध पक्षांचे नेते मंडळी पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी देवी ट्रस्ट कोळा ग्रामस्थ सर्व नेतेमंडळी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले