जवळा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.

जवळा (प्रशांत चव्हाण):- गणेशोत्सव हा सण शासकीय नियमांचे पालन करून सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी शांततेत व आनंदात साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी जवळा तालुका सांगोला येथे शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करू व यासाठी पोलिसांना सहकार्य करा व शांतता एकोपा राखून उत्सव शांततेत पार पाडा तसेच डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करा असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

जवळा गावचे पोलीस पाटील अतुल गयाळी यांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन केले की यावर्षी गणेश मंडळांनी मिरवणुका न काढता मिरवणुकीचा खर्च सामाजिक कार्यासाठी करण्यात यावा.

यावेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब यांचा सत्कार श्री.दत्ता बर्वे(भाऊसाहेब) व सपोनी जगताप साहेब यांचा सत्कार तंटामुक्त अध्यक्ष श्री.अरुण भाऊ घुले-सरकार यांनी केला.

सदर प्रसंगी. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य जवळा व चार वाड्यांचे पोलीस पाटील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button