महाराष्ट्र

फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि सांगोला”* च्या वतीने आयोजित *”हळदी-कुंकू समारंभ”* सर्व शाखांमध्ये उस्ताहात साजरा….

फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि सांगोला”* ही पश्चिम महाराष्ट्रातील कमी वेळेत चांगला आणि अधिकाधिक शाखांमध्ये विस्तार करणारी, सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य अशी व्यावसायिक आणि एक नामांकित आर्थिक सहकारी संस्था आहे. संस्थेची स्थापना सन २०१६ मध्ये सांगोला येथे करण्यात आली असून आज या संस्थेचा व्यावसायिक विस्तार सुमारे  ५ जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने *सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, धाराशिव* या एकूण ३० शाखांपर्यंत झालेला आहे, आणि सर्व शाखेंच्या माध्यमातून *संस्थेची ५०० कोटिकडे व्यावसायिक वाटचाल* सुरू झाली आहे….
फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि सांगोला”* या  सहकारी संस्थेची स्थापना सन २०१६ मध्ये झाली आहे, पण मुळातच या संस्थेची मूळ सुरुवात १९९४ साली इंजिनिअरिंग व्यवसायातून* झाली आहे, आज संस्थेच्या उद्योग समूहाचे स्पारकॉन इंजिनियर्स आणि स्पारकॉन इक्विपमेंट नावे इंजिनिअरिंगचे पुणे येथील 2 औद्योगिक व्यवसाय आहेत, सांगोला येथे फॅबटेक एज्यूकेशन सोसायटी नावे CBSE शाळा, इंजिनिअरिंग  तसेच फार्मसी कॉलेज अशी शैक्षणिक संस्था, त्याचबरोबर स्पारकॉन गारमेंट, स्पिनिंग आणि राविज डेव्हलपर्स, पुणे नावे बांधकाम क्षेत्रात देखील विस्तार वाढवलेला आहे….
या संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रूपनर साहेब आणि व्हा. चेअरमन सूरजजी रूपनर साहेब यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या एक ३० शाखांमध्ये सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ एकाच दिवशी म्हणजेच दि. २१ जाने, २०२५ रोजी अगदी उत्साहात साजरा करण्यात आला, सर्वच शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व महिलांना संस्थेच्या वतीने छोटीशी भेटवस्तू ही देण्यात आली… संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्व महिला वर्गाकडून कौतुकही केलं जातं आहे….
संस्थेच्या सर्व कर्मचारी यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रूपनर साहेब आणि व्हा. चेअरमन सूरजजी रूपनर साहेब यांनीही कौतुक व समाधान व्यक्त केले आहे व संस्थेच्या माध्यमातून असेच नवनविन सामाजिक उपक्रम राबवून समाजाबद्दल आपले योगदान प्रामाणिकपणे देत राहू असा विश्वासही दिला आहे….*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button