जुनोनी ग्रामपंतायतीच्या उपसरपंचपदी सलग तिसऱ्यांदा “हॅट्रिक” करत”सदाशिव रुपनर” यांची बिनविरोध निवड..

सांगोला तालुक्यातील जुनोनी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करत युवकांचे प्रेरणास्थान सदाशिव मारुती रुपनर यांचा एकमेव अर्ज आल्याने व उपसरपंचपदी त्यांचीं बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणुक निर्णय तथा पिठासन अधिकारी व्ही एस फुले विस्तार अधिकारी यांनी जाहीर केले.प्रथम निवड होताच नुतन उपसरपंच सदाशिव रुपनर यांचा शाल श्रीफळ फेटा देवुन निवडणुक निर्णय अधिकारी फुले यांनी जेष्ठ नेते पंचायत समिती सदस्य माजी उपसभापती नारायण तात्या पाटील यांनी स्वागत केले. उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सरपंच सौ मनीषा राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व सदस्य नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक नेते सदाशिव रुपनर हे युवकाचे आयडाँल म्हणुन जुनोनी परिसरात ओळखले जातात ते काळुबाळुवाडी विभागातून सदस्य म्हणुन सलग तिसऱ्यांदा पंचवर्षिक निवडणुकीत विजयी झाले व तिसऱ्यांदा बिनविरोध झाले होते त्यांची सलग तिसऱ्यांदा उपसरपंच पदी वर्णी लागल्यामुळे जुनोनी पंचक्रोशित त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.निवडीनंतर त्यांचे मा आ दिपक आबा साळुंखे पाटील, शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख जुनोनीचे नेते नारायण तात्या पाटील,सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील पत्रकार जगदीश कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
जुनोनी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभाग्रहात उपसरपंच निवडीची विशेष सभा बोलवण्यात आली यावेळी सर्व १५ सदस्य यांच्या व निवडणुक अधिकारी फुले यांच्या विद्यमान सरपंच मनीषा पाटील ग्रामसेवक बी डी अडसूळ यांच्या उपस्थितीत शांततामय वातावरणात बिनविरोध पार पडली.
यावेळी युवक नेते अमृत पाटील, तंटामुक्त समितीचे मा अध्यक्ष चेतन्य रुपनर,नारायण तंडे, बंडू नाना व्हनमाने, ज्येष्ठ नेते दत्ता व्हनमाने (टेलर),पै विलास व्हनमाने, ज्येष्ठ नेते उत्तम होवाळ, बबलू आतार,युवक नेते विनायक व्हनमाने, बिरू ठोंबरे, लक्ष्मण शेळके, संजय शेळके, हनुमंत ठोंबरे, समाधान रुपनर, विजय माळवाले, हरी हाके, रामदास शेळके, सुखदेव ठोंबरे, समाधान शेळके, किसन रुपनर दादासो शेळके रामा माने, धुळा शेळके विशाल रुपनर सागर रुपनर संजय लोखंडे चेंडू शेळके किसन व्हनमाने यांच्यासह जुनोनी काळूबाळूवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुनोनी ग्रामपंतायत कार्यालयाजवळ एसटी स्टँड समोर कार्यकत्यांनी गुलालाची मुक्त उधळण व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.व जुनोनी गावचे ग्रामदैवत सिध्दनाथ पांडुरंग महाराजाचे दर्शन घेवुन पायी चालत असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजय उत्सव साजरा करण्यात आला. सदाशिव रुपनर यांच्या उपसरपंच पदाच्या निवडीमुळे काळूबाळूवाडी जुनोनी भागात समाधान व आनंद व्यक्त होत आहे.