खवासपूर जि.प शाळेत चांगले शिक्षक द्या, गुणवत्ता सुधारा व शाळा वाचवा
ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी.

शासन जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्ता सुधारण्यासाठी व विध्यार्थी संख्या वाढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे कोट्यावधी रुपये खर्च करत आहे पण याचा अपवाद ठरत आहे खवासपूर जिल्हा परिषद शाळा.
१ ली ते ७ वी वर्ग असलेली पूर्वी १५०-२००पट असलेली ही शाळा आज सात वर्गात केवळ २५-३० पट आहे. २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषदेने लाखो रु खर्च करून केलेले दुरुस्ती काम निकृष्ट केल्याने पत्रा व इतर बांधकाम साहित्य कमी दर्जाचे वापरून भ्रष्टाचार केला चौकशीत ते निष्पन्न झाले पण राजकीय दबाव टाकून प्रकरण दाबले गेले दोनच वर्षात पत्रा उडाला व शाळेची पूर्णपणे दुरावस्था झाली,हॅन्डवॅश, प्रोजेक्टर इ साहित्यची झालेली दुरवस्था , तसेच गुणवत्ता अभाव व काही शिक्षकांचे शाळे पेक्षा वयक्तिक कामावर जास्त लक्ष असल्याने गुणवत्ता ढसळली व पट कमी झाला आज शाळे शेजारील विध्यार्थी ५-६ किलोमीटर वर असलेल्या जि.प च्याच वस्ती शाळेत गुणवत्ता असल्यामुळे जात आहेत काही पारगावी खाजगी शाळेत जात आहेत.
अनेक वेळा पालक, ग्रामस्थ यांनी मागणी करून ग्रामसभेत ठराव घेऊन कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मनमानी करणाऱ्या शिक्षक व त्यानं पाठीशी घालणाऱ्या लोकांमुळे अनेक चांगल्या शिक्षकांनी स्वतः होऊन बदली करून घेतली आहे यामुळे शाळा बंद पडतेय कि काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. यासाठी खवासपूर ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जि प च्या प्रशासनाकडे या शाळेत तात्काळ चांगले शिक्षक मिळावेत, गुणवत्ता सुधारणा करावी अशी मागणी केली आहे.
गोंधळ घालून अधिकाऱ्यांना परत जाण्यासाठी पडले भाग शाळेतील परिथिती पाहण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दि २८ जून रोजी शाळेत आले असता काही नागरिक व पालक त्त्यांच्या समोर शाळेतील अडचणी प्रश्न, तक्रार मांडत होते तेव्हा दोन -तीन जणांनी जाणीवपूर्वक शाळा बांधकामातीला भ्रष्टाचारावर चर्चा होऊ नये व चुकीच्या शिक्षकाची पाठराखण करण्यासाठी तिथं गोंधळ तयार केला अश्यातच ते अधिकारी परत निघून गेले