समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे साहेब यांच्या स्मारकासाठी सांगोला शहरात जागा उपलब्ध करून द्यावी – अध्यक्ष संतोष करांडे

सांगोला :-लोणारी समाजाचा मानबिंदू असणाऱ्या समाज रत्न पितामह विष्णुपंत दादरे साहेब यांच्या स्मारकासाठी सांगोला शहरात जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी लोणारी समाज सेवा संघ सांगोला यांच्या वतीने सांगोला नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी लोणारी समाजसेवा संघाचे तालुकाध्यक्ष संतोष करांडे, सचिव दत्तात्रय नरळे, भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर,खजिनदार गोरख निमंग्रे, प्रवक्ते व प्रसिद्धीप्रमुख अनिल नवत्रे, युवक नेते विजय बजबळे, उपाध्यक्ष दादासाहेब घेरडे, युवक नेते सागर गोडसे,उपाध्यक्ष मल्हारी घेरडे, तालुका संघटक बाबासाहेब खांडेकर, वैष्णव हेटकळे, दत्तात्रय करांडे, तुकाराम घेरडे ,प्रकाश करांडे, माजी सरपंच विशाल नरळे, अंकुश डुकरे, विशाल गळवे प्रवीण घेरडे सोमनाथ बाड, काशलिंग खिलारे, औदुंबर गोडसे, संपत करांडे,अमोल सरडे,नागनाथ शिंदे, रमेश करांडे, आकाश करांडे, श्रावण हिप्परकर, शंकर हे नीमंग्रे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
संपूर्ण महाराष्ट्रात सांगोला तालुक्यात सर्वाधिक लोणारी समाज एकवटला आहे आणि एकट्या सांगोला तालुक्यात लोणारी समाजाची सुमारे 60 हजार इतकी लोकसंख्या आहे असे असताना देखील हा समाज उपेक्षित वंचित व दुर्लक्षित राहिला आहे या समाजाचे असणारे अस्मिता समाजाची ओळख व लोणारी समाजाचे पंचप्राण असणारे समाज रत्न विष्णुपंत दादरे साहेब यांचे स्मारक सांगोला शहरात उभे राहावे अशी समाज बांधवांची खूप जुनी मागणी आहे परंतु या मागणीस राज्यकर्ते आणि प्रशासन यांनी वारंवार केराची टोपली दाखवून समाज बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, तथापि या समाजामध्ये शासन व प्रशासनासंदर्भी बैठक घेऊन हा प्रश्न निकाली न निघाल्यास हा लढा तीव्र करण्यात येईल असे लोणारी समाजसेवा संघ तालुका चे अध्यक्ष संतोष करांडे व समस्त लोणारी समाज बांधवांकडून सांगण्यात आले.