शिवणे माध्यमिक विद्यालयाच्या रावसाहेब भजनावळे व मीरा घाडगे -देशमुख यांच्या सेवपूर्ती निमित्त सदिच्छा समारंभ विद्यालयात संपन्न

शिवणे वार्ताहर-शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे येथे 34 वर्षे सेवा करून श्री.रावसाहेब भजनावळे आणि 28 वर्षे सेवा करून मीरा घाडगे-देशमुख हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयात सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे होते तर संस्था सदस्य मोहन गेळे, धनंजय घाडगे,जेष्ठ नागरिक शिवाजी घाडगे महाराज आणि माजी प्राचार्य महादेव ढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीस संस्थापक अध्यक्ष कै. नाना साहेब जानकर आणि सांस्थापक उपाध्यक्ष कै.रामभाऊ वाघमोडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यशवंत नरळे यांनी प्रास्ताविक केल्यावर रावसाहेब भजनावळे यांचा सपत्नीकआणि मीरा घाडगे-देशमुख यांचे पती धनंजय घाडगे या उभयतांचा संपूर्ण पोशाख, मानाचा फेटा बांधून, मायेची शाल,पुष्पहार,श्रीफळ आणि रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर माजी प्राचार्य महादेव ढोणे,शिवाजी घाडगे महाराज माजी नाईक भारत चव्हाण विवेक घाडगे सर,हेमंत रायगवकर सर यांनी आपली मनोगते व्यक्त करून सेवपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या सत्काराला उत्तर देताना रावसाहेब भजनावळे व मीरा घाडगे -देशमुख यांनी संस्था ,शाळा आणि सर्व स्टाफ यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत असे मत मांडले.यावेळी काही क्षण दोघेही भावुक झाले.
प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांनी दोघांना आरोग्यदायी शुभेच्छा देताना दोघांनीही अतिशय प्रतिकूल परिस्थितून शिक्षण घेऊन त्याची जाणीव म्हणून आपल्या शिक्षणसेवा कालावधीत विध्यार्थी हीत केंद्रीभूत मानून अध्यापन कसे केले त्याचे फळ म्हणून त्यांचा कौटुंबिक विकास कसा झाला हे सांगितले.
सदर कार्यक्रमास उद्धव घाडगे,विक्रम घाडगे,रामभाऊ भजनावळे, धायटी गावचे सरपंच नवनाथ येडगे, निलेश नागणे सर,पप्पू जाधव,दत्ता जाधव यांच्या सह घाडगे आणि भजनावळे यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.शोभनतारा मेटकरी यांनी केले तर आभार प्रा.कामदेव खरात यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.