ह भ प वै.शारदादेवी(काकी) साळुंखे-पाटील यांच्या आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीचे जवळे येथून प्रस्थान.

जवळे(प्रशांत चव्हाण) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त ह भ प वै.शारदादेवी(काकी) साळुंखे-पाटील यांच्या आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान जवळे येथून शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता झाले.
तत्पूर्वी श्री.नारायणदेव मंदिर येथून नगरप्रदक्षिणा करीत ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोष करीत ही दिंडी मा.आ. दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या निवासस्थानी आल्यावर तेथे सौ.रूपमतीदेवी दीपकराव साळुंखे-पाटील व युवा नेते यशराजे दीपकराव साळुंखे-पाटील यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.पंडितकाका साळुंखे यांच्या हस्ते व युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ फोडून दिंडीच्या गाडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीने आळंदीकडे प्रस्थान केले.
या दिंडीमध्ये विठूमाऊली चे अनेक वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
या दिंडीमध्ये काकडा, हरिपाठ कीर्तन, प्रवचन,भजन आधी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 ते गुरुवार दिनांक 17 जुलै 2024 या कालावधीमध्ये महाराजांच्या पालखी सोहळ्यात या दिंडीचा सहभाग आहे. सदरच्या दिंडी सोहळ्यात ह भ प अभिमन्यू महाराज घाडगे, ह भ प लहूकाका पाटील, ह भ प नामदेव महाराज मोरे, ह भ प समाधान कदम, दिंडी चालक ह भ प रामेश्वर महाराज नरखेडकर, दिंडी व्यवस्थापक ह भ प दीपक चव्हाण, ह भ प अरुण शिंदे यांच्यासह वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.



