महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक बलवडी शाळेस कोकरे परिवाराकडून वाचनालयासाठी पुस्तके भेट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी या शाळेस श्री मारुती बाबुराव कोकरे यांचे वडील कै. बाबुराव सुभांना कोकरे यांच्या स्मरणार्थ पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाच हजार रुपये किमतीची वाचनालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री मनोहर पवार सर यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब शत्रुघ्न खुळपे होते. सदर कार्यक्रम प्रसंगी कोकरे दाम्पत्यांचा शाल श्रीफळ मानाचा फेटा व भगवद्गीता देऊन शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पवार सर यांनी सत्कार केला.

याचबरोबर बलवडी गावातील नूतन तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री साहेबराव उद्धव शिंदे व तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री बाळासो जगन्नाथ कारंडे या दोघांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शाळेतील सहशिक्षक मा. श्री गोरखनाथ बनसोडे सर, श्री विजयकुमार शिंदे सर, श्री सागर गुरव सर, श्री रणजीत शिंदे सर, शाळेतील सहशिक्षिका श्रीमती योगिता शांत मॅडम, श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम, शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कोकरे कुटुंबीयांकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री रणजीत शिंदे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button