रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमास किराणामाल भेट

रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना सतरंजी व गहू तांदूळ साखर असा किराणामाल भेट देण्यात आला.
रोटरी क्लबचे प्रथम सदस्य डॉक्टर प्रभाकर माळी व रो. प्रतिमा माळी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री वृद्धाश्रमाला 50 किलो तांदूळ 50 किलो गहू , साखर असा किराणामाल व फळांची भेट देण्यात आली . मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक जाधव सर यांनी रोटरीचे व डॉक्टर प्रभाकर माळी यांचे आभार मानले .
याप्रसंगी रोटरी अध्यक्ष डॉ. सजिकराव पाटील सचिव ॲड.सचिन पाटकुलकर रो. विकास देशपांडे रो. विजय म्हेत्रे रो.श्रीपती आदलिंगे रो.माणिक भोसले रो. शरणप्पा हळळीसागर रो. बशीर भाई तांबोळी रो.डोंबे गुरुजी डॉ.सौ सुजाता पाटील इनरव्हील अध्यक्ष सौ लाटणे मॅडम असे सर्वजण हजर होते.
रो.माणिकराव भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वृद्धाश्रम ही भारतीय संस्कृती नाही असे मत व्यक्त केले. तरीसुद्धा वृद्धाश्रमात असणाऱ्यांच्या कडून आपण चांगले काम करतोय याबद्दल आशीर्वादच मिळतील असेही मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉक्टर माळी व प्रतिमा माळी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमांकडून त्यांना औक्षण करण्यात आले व शुभ आशीर्वाद देण्यात आले.
अशाप्रकारे भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.