आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन टेंडर निघेपर्यंत कामावर घ्यावे : डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला : सांगोला नगरपालिकेचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टेंडर वेळेवर न निघाल्यामुळे आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. नवीन टेंडर निघेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवून कामकाजमध्ये सुधारणा करावी असे आवाहन पुरोगामी व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
सध्या सांगोला शहरातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टेंडर वेळेवर न निघाल्यामुळे जवळजवळ 125 ते 135 कर्मचाऱ्यांचे काम थांबवले आहे. यामुळे सध्या शहरात आरोग्य विभाग यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. सध्या शहरात डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यासारख्या अनेक रोगांना सामना करावा लागत आहे.
हा प्रश्न आरोग्याशी निगडित असल्यामुळे नगरपालिकेने कर्मचाऱ्यांचे नवीन टेंडर निघेपर्यंत सर्व जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न असल्यामुळे नगरपालिकेने याचा गांभीर्याने विचार करून सध्या जुन्या सर्व कर्मचाऱ्यांना कामकाजावर बोलवावे. नवीन प्रशासकीय कामकाज टेंडर निघेपर्यंत आरोग्य यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी हे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.