सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी सूत गिरणीची निवडणूक जाहीर

सांगोला ( प्रतिनिधी): सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीच्या निवडणुकीचा जाहीर झाली असून सोमवार 4 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 8 डिसेंबर पर्यंत आहे. तर 7 जानेवारी 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
सहकार निवडणूक प्राधिकरणाने सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीच्या 2023 ते 2028 या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 22 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवार 4 डिसेंबर ते शुक्रवार 8 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
11 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. 12 डिसेंबर रोजी निवडणूक लढविणार्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 12 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. 27 डिसेंबर रोजी निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 7 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर 8 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.