दिपकआबांच्या प्रयत्नांतून नगरपालिकेच्या 130 कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी ; शहरवासियांनी सोडला सुटकेचा निःश्वास

सांगोला शहरात गेली आठवडा भरापासून गाजत असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचारी विषयांवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी यशस्वी शिष्टाई करून मार्ग काढला आहे. मुदत संपलेल्या टेंडरची नव्याने प्रक्रिया जोवर पूर्ण होत नाही तोवर सर्वच्या सर्व म्हणजे १३० कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली.
मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी त्यांची मागणी मान्य करून उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केल्याने सांगोला शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, चंदन होनराव, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, सतीश सावंत, आलमगीर मुल्ला, विनोद रणदिवे यांच्यासह अक्षय बनसोडे, कुंदन बनसोडे, महादेव बनसोडे, रवी चौगुले, अमोल सुरवसे आदिंसह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते
तसेच शहरात आरोग्य कर्मचारी कामावर नसल्याने गेली काही दिवस सर्वत्र अस्वच्छता पसरली होती आता पुन्हा एकदा सांगोला शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी १३० कर्मचारी सज्ज झाल्याने सांगोला शहरवासियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सांगोला नगरपालिकेतील आरोग्य विभागात काम करणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांच्या टेंडरची एक वर्षाची संपल्याने गेली ८ दिवस हे स्वच्छ्ता कर्मचारी घरी बसून होते. हातावर पोट असलेल्या या कर्मचाऱ्यांना कामच उपलब्ध नसल्याने सांगोला शहरातील १३० कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. नवीन ठेकेदार कोण असावा किंवा त्याला कधी पासून ठेका द्यावा हे नगरपालिका प्रशासनाने पहावे परंतु, आपल्याला पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी सर्व १३० कर्मचारी आपल्या मुलाबाळांसह माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या भेटीला आले होते गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी आरोग्य विभागातील कर्मचारी आणि मुख्याधिकारी यांची राष्ट्रवादी भवन सांगोला येथे एकत्रित भेट घेऊन नवीन ठेक्याची प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून घ्यावी आणि जोवर ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर हजर करून घ्यावे अशी सूचना मुख्याधिकरी डॉ सुधीर गवळी यांना केली.
डॉ. सुधीर गवळी यांनीही मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची आग्रही मागणी आणि कर्मचाऱ्यांची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. तसेच आरोग्य विभागातील सर्व १३० कर्मचाऱ्यांना नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर मुदत वाढ देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही मागणी तात्काळ मान्य करून कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले.
चौकट ;
१) १३० कर्मचाऱ्यांनी मानले दिपकआबांचे आभार
गेली आठवडाभर काम बंद असल्याने १३० कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली होती. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी कामावर नसल्याने शहरातील स्वाचातेचा प्रश्न ऐरणीवर आला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबांनी हा ज्वलंत प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याने आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी माजी आमदार दिपकआबांचे आभार मानले तसेच कर्मचारी आणि प्रशासनातील संघर्ष संपून पुन्हा आरोग्य विभागातील कर्मचारी कामावर येणार असल्याने सांगोला शहरातील तब्बल ३० हजाराहून अधिक जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.