महाराष्ट्रसांगोला तालुका
सांगोला आगारातून दररोज सुटणाऱ्या एसटी बसेसच्या काही फेऱ्या रद्द तर काही फेऱ्या उशिरा सुटणार

सांगोला ( प्रतिनिधी):- कोकणातील गणेशोत्सवासाठी सोलापूर जिल्ह्यातून १९० एसटी बसेस मुंबई कडे रवाना झाल्या आहेत त्यामध्ये सांगोला आगारातून वीस एसटी बस पाठवल्या असल्याने सांगोला आगारातून दररोज सुटणाऱ्या एसटी बसेसच्या काही फेऱ्या रद्द तर काही फेऱ्या उशिरा सुटणार असल्याने प्रवाशांनी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन आगार प्रमुख निसार नदाफ व स्थानक प्रमुख सागर कदम यांनी केले आहे.
सांगोला आगारात सध्या एकूण ५५ बसेस उपलब्ध आहेत यातील काही बस लांब पल्ल्याच्या फेऱ्या करीत आहेत तर काही बस ग्रामीण भागामध्ये दररोज फेऱ्या करीत आहेत कोकण विभागामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुंबई येथील चाकरमानी या गणेशोत्सव सणासाठी कोकणात आपल्या मूळ गावी मोठ्या उत्साहात जात असतात सोलापूर जिल्ह्यातून या भाविक भक्तांना सेवा देण्यासाठी मुंबई येथून कोकण विभागात जादा एसटी बस गाड्या सोडल्या जातात कोकणातील गणेश भक्तासाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण १९० एसटी बस मुंबईकडे रवाना केल्या आहेत त्यापैकी सांगोला आगाराकडून एकूण ५५ बसेस पैकी २० बसेस १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान कालावधीसाठी मुंबईकडे पाठवण्यात आल्या आहे .
त्यामुळे सांगोला आगारातून पुणे ,कोल्हापूर या भागात दररोज धावणाऱ्या एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द केल्या आहेत तर ग्रामीण भागात धावणाऱ्या मारोळी, घेरडी ,शिरभावी (ढोले मळा), लिगाडेवाडी, कोंबडवाडी, सोमेवाडी, कोथाळे या मार्गावर धावणाऱ्या मुक्काम एसटी बस गाड्या रद्द केल्या आहेत त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे सांगोला आगाराकडून उपलब्ध असणाऱ्या एसटी बस मधून प्रवाशांना जास्तीतजास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यामुळे प्रवाशांनी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन आगारप्रमुख निसार नदाफ व स्थानक प्रमुख सागर कदम यांनी केले आहे.