इनरव्हील क्लब सांगोला यांच्याकडून गरजू शेतकऱ्यांना कोळपे वाटप

सांगोला (प्रतिनिधी) :-इनर व्हील क्लब सांगोला ही संस्था नेहमीच गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करत असते असेच काही गरजू शेतकऱ्यापर्यंत पोचून शेतकऱ्यांसाठी शेतामधील तन काढण्याचे कोळपे वाटप करण्यात आले.
हा आगळावेगळा उपक्रम इनर व्हील क्लब मार्फत पहिल्यांदाच घेण्यात आला. एकूण 6 शेतकऱ्यांना कोळपे देण्यात आली हा प्रोजेक्ट क्लब सदस्य शालिनी काकी यांच्या शेतात घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी क्लब अध्यक्ष सौ सविता लाटणे ,अश्विनी कांबळे, रत्नप्रभा माळी, मंगल चौगुले, स्वाती ठोंबरे, शालिनी पाटील, संगीता चौगुले, गायत्री जांगळे व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.