श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेचे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील सुयश
कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या 42 व्या स्मृती समारोहानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटातून श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेची कुमारी अनुराधा बाबासो फाटे या विद्यार्थिनीचा चौथा क्रमांक आला.
तिला ट्रॉफी ,प्रमाणपत्र ,व रोख रक्कम 700 रुपये बक्षीस मिळाले. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री. शिवराज रामदास भोसले ,मुख्याध्यापक श्री मनोहर इंगवले सर ,सीनियर शिक्षक श्री .विजयकुमार जगताप सर यांनी यांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. तिला प्रशालेतील सहशिक्षक श्री सुनील मधुकर लिगाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल धायटी ग्रामस्थ व देवकतेवाडी ग्रामस्थ यांचेकडून तिचे कौतुक केले जात आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.