अस्तित्व संस्थेच्या वतीने मोठया उत्साही वातावरण 100 मुलींना सायकलींचे वाटप.
“अस्तित्व” संस्थेच्या माध्यमातून समाजाचा शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेऊन चालू असलेले काम नव्या पिढीला प्रेरणा देणारं व आदर्श घालून देणारं असल्याचे मत सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले अटलास कॉपको व सी एफ टी आय मुंबई यांच्या सहकार्याने व अस्तित्व संस्थेच्या वतीनं काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी सांगोला येथील बंधन पॅलेस येथे ग्रामीण भागातील 100 गरीब व गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अटलास कॉपको इंडिया प्रा.लिमिटेड चे व्यवस्थापक अभिजित पाटील, सी एफ टी आय चे प्रकल्पाधिकारी अमित देशमुख, “अस्तित्व”चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे, संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष अरविंद केदार, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब ठोकळे, अरुण कसबे, अड.सुनिता धनवडे, माजी नगरसेविका सुनिता खडतरे, जितेन्द्र जगधणे, वाणी चिंचाळेच्या सरपंच प्रियांका जितेन्द्र गडहिरे, युवा नेते दत्ता टापरे, उद्योजक अजय इंगवले माजी नगसेवक किशोर बनसोडे यांच्यासह विविध गावचे इत्यादी उपस्थित होते.
पूढे बोलतांना पी आय कुलकर्णी म्हणाले की सायकल वाटपाचे हे काम मुलीच्या शिक्षनाला प्रोछाहन देणारं आहे.शहाजी गडहिरे यांनी कोविड काळात केलेलं काम हे न विसरणार आहे त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा देऊन त्यांनी आभार व्यक्त केले.यावेळी अभिजित पाटील म्हणाले की अटलास कॉपकोच्या वतीने दोन हजार मुलींना सायकल वाटप केले असुन हा उपक्रम असाच पूढे चालू ठेऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणाला प्रोच्छाहन देण्याचा प्रयत्न चालू ठेवणार आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जील्हा उपाध्यक्ष अरविंद केदार म्हणाले की, शहाजी गडहिरे यांच्या माध्यमातून अस्तित्व संस्थेच्या वतीने नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम चालू असतात त्याचा उपयोग तालुक्यातील वंचीत आणि दुर्लक्षित घटकांना होतो आहे ही तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे अस्तित्वच्या कार्याला शुभेच्छा. यावेळी अस्तित्व चे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अस्तित्वच्या कामाची माहिती दिली यापुढेही सायकल वाटप कार्यक्रम पूढे चालू ठेऊन सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील मुलींच्या शीक्षणाला चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सी एफ टी आय मुंबई चे अमित देशमुख यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. उपस्थित विद्यार्थीनिनी आपले मनोगत व्यक्त करून अस्तित्व संस्थेचे आभार व्यक्त केलं, आम्ही निश्चितपणें शिक्षण पुर्ण करु ही ग्वाही मुलीनी दिली.यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालय चे गवळी सर यानी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमांचे सूत्रसंचलन माधुरी जाधव यांनी केले त्यानंतर शंभर मुलींना शिस्तबध्द पणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकलच्या चाव्या देऊन सायकली वाटप केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण सूर्यगंध, खंडेराव लांडगे, विजय धनावडे, सुनिता गडहीरे, नितीन वाघमारे, विशाल काटे, विराज लांडगे व संकल्प गडहिरे विशेष परिश्रम घेतले. गेल्या वर्षी तालुक्यांतील 61 मुलींना सायकलींचे वाटप केलं होते यावर्षी 100 मुलींना सायकल वाटप करण्यात आले त्यामध्ये निवासी आश्रम शाळा डीकसळ, जवाहर विद्यालय घेरडी, मॉडर्न हायस्कूल घेरडी, उदयसिंह देशमुख उर्फ भैयु महाराज विद्यालय वाढेगाव, सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला,कै.संभाजीराव शेंडे विद्यालय मेडशिंगी, विद्यानिकेतन हायस्कूल गौडवाडी, प्रगती विद्यालय वाणीचिचाळे, गुरूदत्त विद्यालय वाकी, लक्ष्मीदेवी विद्यालय राजुरी तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोनेवाडी तालुका मंगळवेढा, बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर तालुका मंगळवेढा या शाळेतील मुलींना शंभर सायकली वाटप करण्यात आल्या.