गुरुवर्य बापूसाहेब झपके गुणवंत शिक्षक पुरस्कार उज्ज्वला साळुंखे यांना जाहीर;

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४२ वा.स्मृतीसमारोहानिमित्त देण्यात येणारा कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार उज्ज्वला साळुंखे सुरवसे प्रशाला, सोलापूर यांना जाहीर झाला.अशी माहिती सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी दिली.हा पुरस्कार आज स ४.०० वाजता कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ प्रमुख पाहुणे यजुर्वेंद्र महाजन प्रसिद्ध वक्ते, संस्थापक दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांचे शुभहस्ते व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या समारंभामध्ये प्रदान करण्यात आहे. आहे. रोख रुपये ११००० ,सन्मान चिन्ह ,मानपत्र शाल व श्रीफळ असे स्वरूप आहे. प्रस्ताव मागवुन विशेष निवड समितीच्या सदस्यांद्वारे सदर पुरस्कारार्थीची निवड अतिशय गोपनीय पद्धतीने केली जाते. सदर जिल्हास्तरीय पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून शैक्षणिक क्षेत्रात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रचंड प्रतिष्ठेचा समजला जातो.
सांगोला शिक्षणक्रांतीचे जनक, शिक्षणातील दीपस्तंभ गुरुवर्य शिक्षणमहर्षी बापूसाहेब झपके , यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला जाहीर झाला. बापूसाहेबांची शिक्षणाप्रतिची आस्था, सेवाभावी वृत्ती, स्वतःला झोकून देऊन निस्वार्थीपूर्ण सतत धडपडत राहण्याचा स्वभाव ! सामाजिक ओढ व तळमळ यामुळेच आपण स्थापन केलेल्या विद्यामंदिर शिक्षणसंस्थेच्या प्रगतीसाठी आपण दिलेले योगदान, राष्ट्रपिता म. गांधी व साने गुरुजींच्या प्रेरणेने, सहवासाने आपल्या कार्याला समाजसेवेचा सुगंध प्राप्त झाला.अशा शिक्षणमहर्षीचा आशीर्वाद रुपी पुरस्काराने मी धन्य झाले. त्यांचाच वारसा चालवणारे त्यांचे सुपुत्र प्रा. प्रबुध्दचंद्र झपके सर व त्यांच्या निवडसमितीचे सर्व सदस्य यांचे मनापासून धन्यवाद ! या ज्ञानतेजाला, प्रकाशपूजकाला विनम्र अभिवादन !
उज्ज्वला साळुंखे
सुरवसे प्रशाला सोलापूर