sangolaeducational

कोणतंही काम करा पण बापूसाहेबांसारखं “बेस्ट”करा- यजुर्वेंद्र महाजन; कै गुरुवर्य बापूसाहेब झपके ४२ वा  स्मृती समारोह सांगता समारंभ संपन्न.

सांगोला( प्रतिनिधी):- प्रत्येकाच्या आयुष्यात प्रचंड मोठ्या समस्या असतात पण त्या सगळ्या समस्यांवर मात करून जो स्वतःला सिद्ध करतो आणि समाजाच्या उपयोगी येतो तोच मानव म्हणून खऱ्या अर्थाने लौकिकास पात्र ठरतो चांगला माणूस व्हायचं असेल तर संस्कारांची तत्त्व आयुष्यभर जोपासली पाहिजेत कोणतेही काम मन लावून केलं की ते बेस्ट होतं बापूसाहेबांनी १९५२ साली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक तळमळ लक्षात घेऊन या संस्थेची उभारणी केली हे बापूसाहेबांनी केलेलं काम बेस्ट ठरलं आहे त्यामुळे कोणतंही काम करा पण ते बापूसाहेबांसारखं बेस्ट काम करा असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध  प्रेरक वक्ते व जळगाव येथील दीपस्तंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला  येथे कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४२ व्या स्मृती समारोह सांगता समारंभात  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,प्राचार्य गंगाधर घोंगडे  उपस्थित होते.सर्वप्रथम कै. बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस  मान्यवरांच्या हस्ते  पुष्पहार समर्पित करण्यात आला .

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकासाचा आलेख कशा पद्धतीने उंचावत आहे हे स्पष्ट केले. संस्था आणि दर्जा हातात हात घालून पुढे जात आहे.विद्यामंदिर सोलापूर जिल्ह्यात ब्रँड ठरत आहे.बापूसाहेबांनी दिलेली तत्वे आजही आम्ही जपतो याचा मनस्वी आनंद वाटतो.केवळ गुणवत्ता हेच शिक्षक निवडीचे निकष आहेत.बापू साहेबांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. असे विचार त्यांनी व्यक्त केले.  प्रशांत रायचुरे  यांनी  प्रमुख पाहुणे  यांचा परिचय करून दिला. त्यानंतर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय  गुणवंत शिक्षक पुरस्कार उज्ज्वला साळुंखे (सुरवसे हायस्कूल सोलापूर) यांना मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र व रोख रक्कम अकरा हजार रुपये देऊन हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

 

तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेच्या वतीने दिले जाणारे गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगोला विद्यामंदिर मधून वैभव विश्वेश्वर कोठावळे,नरेंद्र सुधाकर होनराव, सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधून प्रा. शिवशंकर बापूराव तटाळे, कोळा विद्यामंदिर मधून  रफिक जब्बार मणेरी,कोळा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधून अस्मिता भीमराव माळी,नाझरा विद्यामंदिर मधून दिलावर नालसाहेब नदाफ तर नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधून मंगल वसंत पाटील,सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विभागातून जगन्नाथ तुकाराम साठे यांना तर सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधुन संतोष जयवंत बेहेरे, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधून नाझरा  गुणवंत लिपिक म्हणून हेमंत गजानन नलवडे व सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून तुषार वसंत पवार यांना  यांना  कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके ४२ वा स्मृती सांगता समारंभात प्रसिद्ध वक्ते यजुर्वेंद महाजन यांच्या शुभहस्ते व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्कार वितरण त्यांच्या कुटुंबीयांसमवेत प्रदान करण्यात आले.

 

 

या कार्यक्रमासाठी   सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला सर्व पदाधिकारी,कार्यकारणी सदस्य,सांगोला शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, साहित्यिक, झपके कुटुंबीय,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,पत्रकार, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय स्टाफ ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.

सांगोला शिक्षणक्रांतीचे जनक, शिक्षणातील दीपस्तंभ गुरुवर्य शिक्षणमहर्षी बापूसाहेब झपके , यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला जाहीर झाला. बापूसाहेबांची शिक्षणाप्रतिची आस्था, सेवाभावी वृत्ती, स्वतःला झोकून देऊन निस्वार्थीपूर्ण सतत धडपडत राहण्याचा स्वभाव ! सामाजिक ओढ व  तळमळ यामुळेच आपण स्थापन केलेल्या विद्यामंदिर शिक्षणसंस्थेच्या प्रगतीसाठी आपण दिलेले योगदान, राष्ट्रपिता म. गांधी व साने गुरुजींच्या प्रेरणेने, सहवासाने आपल्या कार्याला समाजसेवेचा सुगंध प्राप्त झाला.
अशा शिक्षणमहर्षीचा आशीर्वाद रुपी पुरस्काराने मी धन्य झाले. त्यांचाच वारसा चालवणारे त्यांचे सुपुत्र प्रा. प्रबुध्दचंद्र झपके सर व त्यांच्या निवडसमितीचे सर्व सदस्य यांचे मनापासून धन्यवाद ! या ज्ञानतेजाला, प्रकाशपूजकाला विनम्र अभिवादन करते.
उज्वला गजेंद्र साळुंके
 सहशिक्षिका सुरवसे हायस्कूल सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!