सांगोला येथे गणेशोत्सव आणि आणि ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):-उत्सव साजरे करत असताना सर्वांनी उत्साह आणि उन्माद यामधील लाईन ओलांडू नये. ध्वनी प्रदुषण टाळून सण साजरा करूया. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येवू न देता सर्वांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा.धार्मिक भावना दुखावणारे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नयेत. यांची काळजी घेत सर्वांनी गणेशोत्सव आनंदात साजरा करावा. ायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेऊन सामाजिक सलोखा राखत धार्मिक सण, उत्सव आनंदात आणि शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.
गणेशोत्सव आणि आणि ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये आयोजित केली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले, गणेश मंडळांनी डिजे, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा सर्वच मंडळांनी पाळावी.परवानगी घेवूनच अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे. समाजप्रबोधन करणारे देखावे सादर करावेत. डॉल्बीला परवानगी नसून मंडळांनी समाजपयोगी सामाजिक कार्यक्रम राबवावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.
गणेशोत्सव मंडळांनी वृक्षारोपण, वैचारिक प्रबोधन, व्याख्यानमाला, रक्तदान, आरोग्य निदान शिबिर, शालोपयोगी साहित्याचे वाटप, गरजू रुग्णांना आर्थिक मदत, ग्रंथांचे वाटप आदी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवावेत.
पो.नि.अनंत कुलकर्णी,