नितीन इंगोले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सांगोला(प्रतिनिधी):- माणगंगा परिवारचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन आबासाहेब इंगोले यांच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर व मतिमंद मुलांकरिता मिष्ठान भोजनाची व्यवस्था करण्यात आली. नितीन इंगोले यांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकलांग असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर वाढदिवस करत त्यांच्या मित्रपरिवाराने वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मानगंगा परिवार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे संचालक मा श्री नितीन खटकळे संस्थेचे संचालक श्री सचिन इंगोले ,विजय वाघमोडे, विवेक घाडगे सर महादेव शिंदे व संस्थेचे तज्ञ संचालक तसेच कचरेवाडी गावचे ग्रामसेवक श्री धनंजय पवार साहेब , मंगळवेढा नगरपालिका इंजिनियर श्री काशीद सर तसेच संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर निकम सर व संस्थेचे सर्व पदाधिकारी वर्ग व व मूकबधिर प्रशाला मंगळवेढा चे सर्व शिक्षक उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणे या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, संस्थेचे संचालक नितीन खटकळे , सचिन इंगोले , विवेक घाडगे सर, अथर्व दूध संकलन चेअरमन विक्रम घाडगे, प्रताप पाटील सर, अजित घाडगे, विलास घाडगे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी घाडगे मेजर उपसरपंच उदयसिह घाडगे व बाबुराव घाडगे ज्ञानेश घाडगे , शंकर जाणकर व इतर मान्यवर उपस्थित होते
त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा महारणवर वस्ती ,चिकमहुद येथे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी श्री विजय वाघमोडे ,नितीन खटकाळे , सचिन इंगोले विवेक घाडगे माणगंगा परिवार चे सर्व अधिकारी उपस्थित होते.