*डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा.*

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चा २० वा वर्धापन दिन संपन्न झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी केली. विद्यापीठाचे मूळ नाव “सोलापूर विद्यापीठ” असे असून ६ मार्च २०१९ रोजी नामविस्तार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर” असा करण्यात आला. विद्यापीठाचा १९ वा वर्धापन दिन प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांच्या हस्ते विद्यापीठाचा ध्वज फडकवून साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि इतर घटकांना विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या प्राचार्य मार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. सदरचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. ठोंबरे जे. व्ही. एन.सी.सी ऑफिसर, कॅप्टन आबासाहेब इंगवले, श्री पवार व्ही. एम. क्रीडा संचालक, डॉ. घाडगे के.बी. एन.एस.एस. प्रोग्राम ऑफिसर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.