सांगोले नगरपरिषदे मार्फत स्वच्छता मोहीम
स्वच्छतेची जनजागृती करणेसाठी सांगोले नगरपालिकेने अनेक उपक्रम हाती घेतेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छ भारत अभियान’ 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दि. 15-09-2023 ते 02-10-2023 या कालावधीत “स्वच्छता पंधरवडा “आयोजित केलेला आहे त्याच निर्देशानुसार श्री. स्वप्नील हाके यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा 4.0 , स्वच्छ सर्व्हेक्षण 2024 व Indian Swachhta League 2.0 अंतर्गत दि. 17-09-2023 रोजी सांगोले नगरपरिषद सांगोले मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
सकाळी 7.00 वाजता कचेरी रोड व सांगोले तहसील ऑफिस येथे सांगोले नगरपरिषदेचे सफाई कामगार यांच्या साहाय्याने साफ सफाई करण्यात अली होती. तसेच न्यू इंग्लिश स्कूल जू कॉलेज सांगोले चे “राष्ट्रीय सेवा योजना” ( NSS ) चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी जय भवानी चौक ते स्टेशन रोड ची साफसफाई केली. तसेच लोकांना स्वच्छतेचे संदेश देण्यात आले.
यानंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सादर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सांगोले शहर समन्वयक सौ तेजश्री बगाडे व न्यू इंग्लिश स्कूल जू कॉलेज सांगोले चे प्राचार्य हेमंतकुमार आदलिंगे राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रकल्पाधिकारी प्रा. संतोष राजगुरू,प्रा. मिलिंद पवार-कार्यक्रमाधिकारी,प्रा. सौ जुलेखा मुलाणी कार्यक्रमाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अधिकारी कर्मचारी व शालेय विद्यार्थी यांचे आभार सांगोले नगरपालिकेचे कार्या. अधिक्षक. स्वप्नील हाके यांनी मानले.