युवक कॉंग्रेसने साजरा केला सांगोल्यात वडे तळून बेरोजगार दिवस


सांगोला विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने
विद्यमान भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले पण त्यांनी रोजगार देणे सोडा आहे ते रोजगार युवकांच्या हातातून काढून घेण्याचे काम केलेले आहे. जीएसटी व नोटा बंदीच्या निर्णयामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण त्यांना यावी म्हणूनच बेरोजगार दिवस साजरा करत युवक कॉंग्रेसने सांगोल्यात अनोखे आंदोलन करत नागरिकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. शहरातील नेहरू चौकात अनोखे आंदोलन करत भाजप सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
भाजप सरकारने 10 वर्षात दिले काय लॉलीपॉप लॉलीपॉप, भाजप हटाव देश बचाव, मोदी तेरे राज युवा गये जेल में, बेरोजगार बोले हॅलो हॅलो मोदी बोले भजीया तलो अशा कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी विधानसभा युवक अध्यक्ष अजितदादा चव्हाण, शहर युवक अध्यक्ष फिरोज मणेरी, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अक्षय महामुनी , युवक उपाध्यक्ष काशिनाथ ढोले कॉंग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.