जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत नाझरा विद्यामंदिरच्या मुलांचा संघ अजिंक्य..

नाझरा(वार्ताहर):- रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या 17 वर्षे वयोगट मुले संघाने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला तर मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.मुलांच्या संघातून साहिल रणदिवे,यासीन नदाफ,रोहन लवटे,तुषार बनसोडे,सोमनाथ गोसावी,विक्रम पांढरे,शुभम सोनार, तेजस पाटील, सोहन आदट,बसवेश्वर चौगुले व महेश बनसोडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता., तर मुलींच्या संघामधून दीक्षा वाघमोडे, प्रणाली बनसोडे,गौरी चौगुले,सानिका खरात, विद्या पाटील,जानवी वाघमारे, मोनिका रणदिवे,सुप्रिया बंडगर, वैष्णवी शिनगारे व ऋतुजा बंडगर यांनी सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक चारुदत्त जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य,प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,विनायक पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.